पंतप्रधान मोदींसमोर लाडकी बहीण योजनेवर बोलताना Asha Bhosle का झाल्या भावुक?

72
पंतप्रधान मोदींसमोर लाडकी बहीण योजनेवर बोलताना Asha Bhosle का झाल्या भावुक?
पंतप्रधान मोदींसमोर लाडकी बहीण योजनेवर बोलताना Asha Bhosle का झाल्या भावुक?

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उपस्थितीत ‘अभिजात मराठी सन्मान सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. यावेळी आशा भोसले (Asha Bhosle) यांनी लाडकी बहीण योजनेचं कौतुक करताना त्यांच्या आयुष्यातील खडतर दिवसांची परिस्थिती सांगितली.

…तर मी दोन वेळचं जेवले असते

आशा भोसले (Asha Bhosle) म्हणाल्या, “लाडक्या बहिणींना महायुती सरकारनं जे १५०० रुपये दिले आहेत, त्यामागचा आनंद माझ्यापेक्षा इतर कुणाला कळणार नाही. हेच काम जर १९४७ साली कुणी केलं असतं. तर मी दोन वेळचं जेवले असते. सकाळचं जेवण संध्याकाळसाठी जपून ठेवलं नसतं. कारण दुपाआजच्या काळात कोटी, लाख यांची चर्चा होते. पण ज्या महिलांकडे जेवणासाठी थोडे पैसे नसतात त्यांच्यासाठी १५०० रुपये ही मोठी रक्कम असून महायुती सरकारने त्यांच्यासाठी मोठं काम केलं आहे.”

(हेही वाचा-Chembur मध्ये मध्यरात्री चाळीतील घराला आग; 7 जणांचा होरपळून मृत्यू)

“मी संगीत क्षेत्रात असले तरी मी एक गृहिणी आहे. एका महिलेला घरात जे काम करावं लागतं, ती सर्व कामं मी करते. घरातलं काम करता करता, मुलांना मोठं केलं. भोसले कुटुंब सांभाळलं. हे करता करता कधी ९२ वर्षांची झाले, हे ही कळलं नाही. कधी उपाशी राहून तर कधी जे आहे ते खाऊन दिवस काढले. पण कधीच कुणासमोर हात पसरले नाहीत. हाच माझा गुरुमंत्र होता.”री मी जेवत नव्हते. माझे पती सायंकाळी आल्यानंतर आम्ही दोघं मिळून जेवत होतो.” (Asha Bhosle)

(हेही वाचा-Nitin Gadkari : आता विमानासारखा अनुभव घ्या बसमध्ये! नितीन गडकरी यांचं नवीन स्वप्न काय?)

“माझं घर सांभाळता सांभाळता मला इतर काहीच सांभाळता आलं नाही. मला राजकारणही समजलं नाही. म्हणून मला पंतप्रधान मोदींना एक प्रश्न विचारायचा आहे. ‘एवढा मोठा भारत तुम्ही कसा काय सांभाळता?’ आम्ही तर आमचं घरही सांभाळताना थकून जातो. प्रत्येकाच्या घरात आज जेवण शिजतंय, प्रत्येकाच्या घरात वीज आहे. हे सर्व तुम्ही केलं. मी तुमच्यापेक्षा वयानं मोठी आहे. मी तुम्हाला आशीर्वाद देते. तुम्ही याच पद्धतीने काम करत रहा. आपला देश तुमच्या हातात राहो. तुमचे सहकारीही चागंले काम करत राहो.” असे आशा भोसले यावेळी म्हणाल्या. (Asha Bhosle)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.