Ashadhi Wari शांत, समावेशक परंतु रामनवमी, हनुमान जयंती शोभायात्रा हिंसक; इरफान इंजिनियर यांच्याकडून हिंदू धर्माचा अवमान

वारकऱ्यांनी ब्राह्मणांना अधिकार नाकारले त्यामुळे समानता आली संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम हे वारकरी परंपरेतील संत आहेत. वारकरी चळवळीने धर्म, मंदिर, कर्मकांड आणि पांडित्य यांचे संरक्षक म्हणून ब्राह्मणांना असलेले अधिकार नाकारले, जातीव्यवस्था नाकारली. ब्राह्मणवादी व्यवस्थेने नाकारलेले, तळच्या श्रेणीतील, जाती जमातील लोक, समानतेच्या तत्त्वामुळेच वारकरी चळवळीकडे आकर्षित झाले, असे इरफान इंजिनियर म्हणाले.

190

अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी २५० किमी पायवारी करून वारकरी पंढरपुरात दाखल होतात. कानाकोपरातून विविध भागातील दिंड्या या वारीला (Ashadhi Wari) मिळतात आणि लाखो हिंदूंचा हा उत्सव भक्ती भावात साजरा होतो, पण हा उत्सव हिंदूंचा नाहीच तर तो धर्मनिरपेक्ष कसा आहे, असे भासवण्याचा खटाटोप तथाकथित पुरोगामी करत आहेत. त्यामध्ये मुसलमान यात अग्रेसर आहेत.

अशा पुरोगाम्यांची टोळकी वारीत सहभागी झाली, त्यासाठी राष्ट्र सेवा दल या पुरोगामी-समाजवादी संघटनेचे शरद कदम यांनी दिंडीचे (Ashadhi Wari) आयोजन केले.होते. त्यामध्ये पुरोगामी लेखक, कलाकार, कार्यकर्ते यांनी यात सहभाग घेतला होता. असेच एक महाभाग इरफान इंजिनियर जे सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी ॲण्ड सेक्युलॅरिझम या संस्थेचे संचालक यात वारीत सहभागी झाले होते. त्यांनी या वारीतील आलेले अनुभव लोकसत्तामध्ये लेख लिहून मांडले आहेत. त्यामध्ये इंजिनियर यांनी लेखामध्ये हिंदू धर्माला लक्ष्य केले. या वारीत मोहनदास करमचंद गांधींचे पणतू तुषार गांधी, मराठी कवी अरुण म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते फिरोज मिठीबोरवाला हेही सहभागी होते.

काय म्हणाले इंजिनियर?

वारकऱ्यांनी ब्राह्मणांना अधिकार नाकारले त्यामुळे समानता आली संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम हे वारकरी परंपरेतील संत आहेत. वारकरी चळवळीने धर्म, मंदिर, कर्मकांड आणि पांडित्य यांचे संरक्षक म्हणून ब्राह्मणांना असलेले अधिकार नाकारले, जातीव्यवस्था नाकारली. ब्राह्मणवादी व्यवस्थेने नाकारलेले, तळच्या श्रेणीतील, जाती जमातील लोक, समानतेच्या तत्त्वामुळेच वारकरी चळवळीकडे आकर्षित झाले.

(हेही वाचा Ashadhi Ekadashi 2024 : विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल- आषाढी एकादशीचे काय आहे महात्म्य?)

तुकारामांनी अल्लाह आणि विठ्ठल यांच्यातील फरक मिटवला 

या दिंडीमध्ये माझी डॉ. पिल्लई यांच्याशी भेट झाली. त्यांच्याशी बोलताना समजले की त्यांची मातृभाषा मल्ल्याळम आहे. ते सध्या बारामतीमध्ये राहतात आणि ते व्यवसायाने डॉक्टर आहेत. त्यांनी तुकारामांवर लिहिलेली कविता त्यांनी मला दाखवली. त्या कवितेचे सार असे होते की “तुकारामांनी अल्लाह आणि विठ्ठल यांमधला फरक मिटवला, तसेच जाती-जमातीतील भेदभाव नाहीसा केला.”

राम नवमी, हनुमान जयंती यात्रा जातीय हिंसाचारी 

एकीकडे प्रेम, आदर, शांतता आणि समावेशकतेच्या मुल्यांचा प्रसार करणारी वारी (Ashadhi Wari) इतकी निर्मळ आणि शांत आहे, तर दुसरीकडे अलीकडच्या काळात रामनवमीच्या मिरवणुका, जल अभिषेक शोभा यात्रा (नूह, हरियाणामध्ये), हनुमान जयंती शोभा यात्रांमध्ये जातीय हिंसाचार दिसतात. मुस्लिमांना शांततेने प्रार्थना करता यावी यासाठी काही पारंपरिक यात्रा मशिदीजवळून जाताना संगीत वाजवणे थांबवतात. तथापि, हिंदुत्ववादी राजकीय विचारसरणीच्या अनुयायांनी संघटित केलेले लोक अनेकदा पोलिसांनी दिलेल्या परवाना/परवानगीच्या अटींचे उल्लंघन करतात. ते यात्रेच्या पारंपरिक मार्गापासून वेगळा जाण्याचा आग्रह धरतात आणि मुस्लिम वस्त्यांमध्ये जातात, प्रार्थनेच्या वेळेसह मशिदींजवळ मोठ्या आवाजात संगीत वाजवतात आणि हिंदूंचे श्रेष्ठत्व सांगून राजकीय घोषणा देतात. हिंदुत्ववादी विचारसरणीच्या लोकांनी आयोजित केलेल्या शोभा यात्रा, हनुमान जयंतीमध्ये सहभागी होण्यास मुस्लीम समुदायातील लोक घाबरतात. वारीमध्ये सहभागी झालेले लोक शांत होते. त्याउलट हिंदुत्ववादी शोभा यात्रेतील सहभागींमध्ये एकीकडे श्रेष्ठत्व आणि अभिमानाची भावना दिसते तर दुसरीकडे त्यांच्यामध्ये असलेले अल्पसंख्याकांबद्दलचे पूर्वग्रह, लहानसहान कारणासाठी त्यांना हिंसक बनवतात.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.