बेस्ट समितीवर पाचव्यांदा चेंबूरकर!

आजवर बेस्टच्या इतिहासात पाच वेळा अध्यक्ष कोणताच नगरसेवक बनला नसून, ही विक्रमी नोंद चेंबूरकर यांच्या नावावर झाली आहे.

133
बेस्ट समिती अध्यक्षपदी आशिष चेंबूरकर यांची पुन्हा एकदा निवड झाली आहे. महापालिकेतील काँग्रेसचे उमेदवार आणि विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे, चेंबूरकर यांचा विजय सोपा झाला. त्यामुळे पिठासिन अधिकारी असलेल्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी अधिक मते मिळवणाऱ्या चेंबूरकर यांची विजयी उमेदवार म्हणून जाहीर घोषणआ केली. पाचव्यांदा बेस्ट समिती अध्यक्षपद बनण्याचा मान चेंबूरकर यांनी पटकावला आहे.

चेंबूरकरांनी नोंदवला विक्रम

बेस्ट समिती अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या वतीने आशिष चेंबूरकर, काँग्रेसच्या वतीने विरोधी पक्षनेते रवी राजा आणि भाजपच्या वतीने प्रकाश गंगाधरे हे निवडणूक रिंगणात होते. मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या १५ मिनिटांच्या वेळेत  रवी राजा यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे चेंबूरकर आणि गंगाधरे यांच्यात झालेल्या लढतीत चेंबूरकर यांना ०९ तर गंगाधरे यांना ०६ मते मिळाली. तर काँग्रेसच्या सदस्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. त्यामुळे चेंबूरकर यांना विजयी म्हणून घोषित करण्यात आले. चेंबूरकर यापूर्वी सलग तीन वेळा अध्यक्ष बनले होते, त्यानंतर या नगसेवक कालावधीत ते पुन्हा एकदा अध्यक्ष बनले आणि आता परत एकदा त्यांनी या पदावर आपली मोहर उमटवली आहे. आजवर बेस्टच्या इतिहासात पाच वेळा अध्यक्ष कोणताच नगरसेवक बनला नसून, ही विक्रमी नोंद चेंबूरकर यांच्या नावावर झाली आहे. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर चेंबूरकर यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मांसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या तसबिरीला चाफ्याच्या हार अर्पण करत त्यांचे आशीर्वाद घेतले.
f30eed00 e536 4649 b07d 9e41bf09d50b

मागील निवडणुकीत दोन्ही उमेदवारांची मते बाद

मागील बेस्ट समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत  शिवसेना उमेदवार प्रविण शिंदे आणि भाजप उमेदवार प्रकाश गंगाधरे या दोघांची मते अवैध ठरली होती. या दोघांनी आवाजी मतदान आपल्या उमेदवाराला म्हणजे स्वत:ला केले. पण प्रत्यक्ष स्वाक्षरी प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या नावापुढे केल्याने ती अवैध ठरली. आजवरच्या वैधानिक समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांची मते अवैध ठरण्याची ही पहिली घटना होती.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.