परशुराम महामंडळाच्या अध्यक्षपदी Ashish Damle यांची निवड

115
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षपदी Ashish Damle यांची निवड
  • प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ब्राह्मण समाजासाठी गठीत करण्यात आलेल्या परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आशिष दामले (Ashish Damle) तर, महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी तुषार पवार तसेच बापू भेगडे यांची निवड करण्यात आल्याची माहिती उपमुख्यंमत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी बुधवारी (१६ ऑक्टोबर) दिली.

(हेही वाचा – Assembly Elections 2024 : विधानसभा निवडणुकीतही मतदान केंद्रात मोबाईल फोनसह प्रवेशबंदी!)

राज्य सरकारने परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना नियोजन विभागाच्या ३ ऑक्टोबर २०२४ रोजी शासन निर्णयाद्वारे कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम ८ मधील तरतुदीनुसार करण्यात आली होती. यानुसार बुधवारी महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी आशिष दामले (Ashish Damle) यांची निवड करण्यात आली. तर तुषार पवार आणि बापू भेगडे यांची महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियम १९८३ मधील कलम १२ (२) (ब) मधील तरतुदीनुसार संदर्भ क्र. १ अन्वये ही निवड करण्यात आल्याचे तटकरे (Sunil Tatkare) यांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.