काँग्रेसच्या नेत्यांविरोधात वक्तव्य केल्यामुळे आशिष देशमुखांना काही महिन्यांपूर्वी निलंबित करण्यात आले होते. तेव्हापासून आशिष देशमुख भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. अखेर आशिष देशमुख यांनी रविवारी, १८ जून रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना काँग्रेस आणि गांधी परिवार हा ओबीसी द्रोही असल्याची टीका देशमुखांनी केली.
(हेही वाचा – आशिष देशमुखांची घरवापसी; फडणवीस आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत देशमुखांचा भाजपमध्ये प्रवेश)
नेमकं काय म्हणाले आशिष देशमुख?
‘ऐवढा तर मी वाईट नाहीये की काँग्रेस पक्षानं मला बडतर्फचं केलं, हकालपट्टीचं केली, तेही सहा वर्षांसाठी केली. मी काय म्हटलं होत? राहुल गांधींनी २०१९च्या निवडणुकीच्या दरम्यान अनावधानाने समजा ओबीसींबद्दल चुकीचं म्हटलं असेल तर त्यांनी या देशातील ५४ टक्के असलेल्या ओबीसी समाजाची माफी मागावी. बरं हे मी काय पहिल्यांदा म्हटलं का, माफी मागावी. सर्वोच्च न्यायालयात राफेलच्या प्रकरणात किंवा ‘चौकीदार चोर है’च्या प्रकरणात बिनशर्त लेखी राहुल गांधींनी माफी मागितली. पण जेव्हा ओबीसींचा प्रश्न आला तेव्हा त्यांनी माफी मागितली नाही. म्हणून काँग्रेस असेल किंवा गांधी परिवार असेल, हा ओबीसी द्रोही आहे, असं मी इथे ठामपणे सांगतो,’ असं आशिष देशमुख म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community