काँग्रेस पक्षाच्या शिस्तपालन समितीने शुक्रवारी अखेर आशिष देशमुख यांना कारणे दाखवा नोटीस बजावत तीन दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे. जोपर्यंत उत्तर देत नाही, तोपर्यंत आशिष देशमुख यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर बोलतासाठी शनिवारी आशिष देशमुखांनी माध्यमांसोबत संवाद साधवा. यावेळी त्यांनी माझ्याऐवजी नाना पटोलेंना नोटीस देऊन स्पष्टीकरण मागण्याची गरज आहे. कारण नाना पटोले यांनी न विचारता विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडले, असा खळबळजनक आरोप आशिष देशमुख यांना केला.
आशिष देशमुख म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यामागच्या षयंत्रणाचा नाना पटोले हे देखील भाग होते. पक्षाने खरी नोटीस नाना पटोलेंना द्यायला पाहिजे होती. कारण त्यांच्यामुळे आज महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार नाहीये. आणि मविआचे जे सरकार कोसळले, ते नाना पटोले यांनी न विचारता दिलेल्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यामुळे. म्हणून पक्षाने नाना पटोले यांनी नोटीस देऊन स्पष्टीकरण मागण्याची गरज आहे.
पुढे देशमुख म्हणाले की, हायकमांडेच निटकवर्तीय नाना पटोले असल्याचे बोलले जाते. पण त्यांच्यामुळे पक्षाचे नुकसान होत असेल, आणि एवढ्या मेहनतीने आणि सर्वाच्या पुढाकाराने बनलेले मविआचे सरकार मुळात त्यांच्या एका कृतीमुळे पडत असेल, तर नक्की त्यांच्यावर काँग्रेस पक्षाने शिस्तभंगाची कारवाई करावी.
(हेही वाचा – नॉट रिचेबलच्या वृत्तावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…)
Join Our WhatsApp Community