Ashish Shelar यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला विचारला ‘हा’ सवाल

93
उद्धव ठाकरेंचे आंदोलन म्हणजे राजकीय गिधाडीवृत्ती; Ashish Shelar यांचे प्रत्युत्तर
  • प्रतिनिधी

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठीच्या जाहिरनाम्यात नॅशनल कॉन्फरन्सने काश्मीरसाठी वेगळा झेंडा निर्माण करू, ३७०, ३५ (अ) कलम पुन्हा लागू करू आदी आश्वासने दिली आहेत. या आश्वासनांशी काँग्रेस, उद्धव ठाकरे सहमत आहेत का? असा सवाल मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शनिवारी (२४ ऑगस्ट) केला. संपूर्ण देश तिरंगा झेंड्याखाली एकत्र असताना काश्मीरसाठी स्वतंत्र झेंडा तयार करण्याचे आश्‍वासन देणे म्हणजे तुकडे-तुकडे गँग पुन्हा कामाला लागली असल्याचे दिसून येत आहे, अशी टीकाही त्यांनी केली

भारत निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर विधानसभेसाठी निवडणूक जाहीर केली आहे. या निवडणुकीसाठी नॅशनल कॉन्फरन्सने घोषित केलेल्या जाहिरनाम्यातील आश्‍वासनांची माहिती देत शेलार (Ashish Shelar) यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यावर प्रश्‍नांची सरबत्ती केली.

(हेही वाचा – North East Mumbai Lok Sabha Constituency : कोटेचांचे पाय जमिनीवर…)

नॅशनल कॉन्फरन्सने काश्मीरसाठी पूर्वीप्रमाणे स्वतंत्र झेंडा तयार करू, असे आश्‍वासन दिले आहे. काँग्रेस नेतृत्वाने, उद्धव ठाकरे यांनी नॅशनल कॉन्फरन्सच्या या आश्‍वासनाशी आपण सहमत आहोत का, हे स्पष्ट करावे. नॅशनल कॉन्फरन्सने विधानसभा निवडणुकीत मते मिळवण्यासाठी ही देशविघातक भूमिका घेतली आहे. त्याचबरोबर ३७० आणि ३५(अ) ही घटनेतील कलमे पूर्ववत करू, असे आश्‍वासन ही आपल्या जाहिरनाम्यात दिले आहे. याचा अर्थ ही कलमे रद्द करण्यापूर्वी राज्यात जी स्थिती होती ती पुन्हा आणणे असा होतो. या आश्‍वासनाला काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांचे समर्थन आहे का? असा प्रश्‍न शेलार (Ashish Shelar) यांनी केला.

नॅशनल कॉन्फरन्सने शंकराचार्य पर्वताचे ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक महत्व विसरून त्याचे तख्त-ए-सुलेमान त्याचबरोबर हरी पर्वताचे कोह-ए-मारन असे नामांतर करण्याचे आश्‍वासन दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी अलिकडेच एका शंकराचार्यांना आपल्या निवासस्थानी आमंत्रित केले होते. त्यांचे या नामांतराला समर्थन आहे का? काँग्रेसची या नामांतराबाबत भूमिका काय हे स्पष्ट होणे गरजेचे आहे, असे आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.