Ashish Shelar यांचा संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल; म्हणाले, कामगारांना उद्ध्वस्त करणाऱ्या…

348
Ashish Shelar यांचा संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल; म्हणाले, कामगारांना उद्ध्वस्त करणाऱ्या...
Ashish Shelar यांचा संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल; म्हणाले, कामगारांना उद्ध्वस्त करणाऱ्या...

पंतप्रधान नरेंद्र मोदी जिंकले असे म्हणणाऱ्या लोकांनी डोकी तपासून घ्यावीत, कारण कुबड्या काढल्या तर सरकार कोसळू शकते, अशा शब्दांत उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्या सरकारवर टीका केली होती. त्या टीकेला सोमवारी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी खरपूस समाचार घेतला.  (Ashish Shelar )

(हेही वाचा – CM Majhi Ladki Bahin Yojana : शुल्क वसूल करणाऱ्यांविरोधात महापालिकेची पोलिसांत तक्रार)

श्रीमान मोरारजी राऊत… महाराष्ट्रात एखादा उद्योग व्यवसाय येणार किंवा नवीन विकास प्रकाल्प होणार असे कळताच आणि राजकीय स्वार्थासाठी हातात विरोधाचा झेंडा घेऊन जे उरतात, उद्योगांना महाराष्ट्रातून पळवून लावतात, त्याच पक्षाचे नेते संजय राऊत महाराष्ट्रातून उद्योग गेले म्हणून “हग्रलेख” लिहितात?” अशी खोचक टीका शेलारांनी केली.

(हेही वाचा – BMC : महापालिकेतील अभियंत्यांची भरती जरांगे पाटील यांच्यामुळे अडली

“मराठी कामगारांना उद्ध्वस्त करणाऱ्या उबाठाचे हात मराठी माणसाच्या रक्ताने ही माखलेले आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मराठी माणासावर गोळ्या झाडणाऱ्या स. का. पाटील, मोरारजी देसाई यांच्या काँग्रेसच्या मांडीवर तुम्ही बागडत आहात ना? काँग्रेसशी हात मिळवणी केलीत, तुमच्या हाताला मराठी माणसाचे रक्त लागलेले आहे. तुम्हाला इतिहास कधीच माफ करणार नाही. श्रीमान संजय राऊत तुमचे कसे झालेय सांगू का? दुदैवाने ज्याला वेड लागते म्हणजे तुमच्या सारखा जो मनोरुग्ण असतो त्याला ना “आपण सोडून सगळं जग वेडं वाटत असतं” …म्हणून तुम्ही मोरारजी राऊत आहात!” अशी बोचरी टीका आशिष शेलारांनी केली. (Ashish Shelar )

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.