उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात बलस्थानी भाजपा असूनही महाविकास आघाडीच्या वर्षा गायकवाड या विजयी ठरल्या. या मतदारसंघातील विलेपार्ले आणि वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार उज्ज्वल निकम यांना सर्वांधिक मताधिक्य मिळणे अपेक्षित होते. परंतु विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात सुमारे ५० हजारांची आघाडी मिळाली तरी वांद्रे पश्चिममधून ३ हजार ६०६ मतांची आघाडी मिळाली. वांद्रे पश्चिम हा मतदारसंघ भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांचा असून या मताधिक्यांवरही शेलार खुश दिसत आहेत. एका बाजुला शेलारांकडून किमान २५ हजारांची आघाडी आवश्यक होती, परंतु साडेतीन हजारांचेच मताधिक्य मिळाल्यानंतरही शेलार खुश असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Ashish Shelar)
उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड या केवळ १६ हजार मतांनी विजयी ठरल्या. या मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना ४ लाख ४५ हजार ५४५ मते मिळाली, तर भाजपाचे उज्ज्वल निकम यांना ४ लाख २९ हजार ०३१ मतदान झाले. या निवडणूक निकालामध्ये विलेपार्ले मतदार संघातून निकम यांना ९८,३४१ मते मिळाली तर गायकवाड यांना केवळ ४७,०१६ मते मिळाली, पण चांदिवली मतदार संघात निकम यांना ९८ हजार ६६१ आणि गायकवाड यांना १ लाख ०२ हजार ९८५ मते मिळाली. जिथे भाजपा आणि शिवसेनेची ताकद असली तरी काँग्रेस नेते नसीम खान यांचाही विभाग आहे. त्यामुळे भाजपाने त्यांना या मतदार संघात जास्त लिड घेऊ दिले नाही. पण भाजपालाही जास्त मिळवता आले नाही. तर कुर्ला विधानसभा क्षेत्रात गायकवाड यांना सुमारे २४ हजारांचे मताधिक्य होते, तर कलिनामध्ये सुमारे १६ हजारांचे, वांद्रे पूर्व मध्ये सुमारे २८ हजारांचे मताधिक्य होते. आणि वांद्रे पश्चिमध्ये निकम यांना ७२,९५३ मते मिळाली आणि गायकवाड यांना ६९,३४७ मते मिळाली. या मतदार संघात जर निकम यांना विलेपार्ले प्रमाणे २५ ते ३० हजारांच्या मतांची आघाडी मिळाली असती तर गायकवाड यांच्या विजयाचे चित्र दिसले नसते. (Ashish Shelar)
(हेही वाचा – Narendra Modi: गंगा मातेने मला दत्तक घेतले, रात्रंदिवस मेहनत करेन; गंगामातेची आरती करून मोदींनी घेतली शपथ)
विशेष म्हणजे या मतदारसंघाची संपूर्ण जबाबदारी ही भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडे होती आणि त्यांनी इतर विधानसभा लोकसभा मतदारसंघातील रणनिती आखताना जिथे जास्त मते घेता येतील त्या स्वत:च्या मतदारसंघात दुर्लक्ष केले, असेच दिसून येत आहे. खुद्द शेलार यांच्या मतदारसंघात निकम यांना केवळ ३६०० मतांची आघाडी मिळाली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराला आजवर २५ ते २६ हजारांची आघाडी मिळालेली आहे. खुद्द विधानसभा निवडणुकीत आशिष शेलारांना या मतदारसंघांमध्ये सुमारे ७० ते ७५ हजारांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे जर अपेक्षेप्रमाणे २६ ते २६ हजारांचे मताधिक्य निकम यांना या मतदारसंघात लाभले असते तर निकम भाजपाचा आणखी एक खासदार वाढला गेला असता. विशेष शेलार यांच्याकडे या मतदारसंघाची जबाबदारी असल्याने त्यांनी आपल्या स्वत:च्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष केले. यावेळेस बाबा सिद्दीकी हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्याने तसेच ते महायुतीचा भाग बनल्याने वांद्रे पश्चिममध्ये मताधिक्य वाढवण्याची संधी होती. परंतु मुस्लिम मतांबरोबरच ख्रिश्चन आणि दलित मतांमुळे काँग्रेस उमेदवाराच्या बाजूने मतदान केल्याने शेलारांना आपल्या मतदारसंघात केवळ ३६००ची आघाडी घेता आली. त्यामुळे शेलार हे सोशल मिडियावर ट्रोल होत असून भाजपाच्या मुंबई अध्यक्षाला जिथे स्वत:च्या मतदारसंघात केवळ साडेतीन हजारांचे मताधिक्य घेता येत असेल आणि ते त्यावर खुश असतील तर भाजपाच्या मुंबई अध्यक्षांचे हे मोठे अपयश असल्याचे बोलले जात आहे. (Ashish Shelar)
विधान सभा निहाय उमेदवारांना मिळालेली मते
- विलेपार्ले मतदारसंघ : निकम यांना ९८,३४१ मते, गायकवाड यांना ४७,०१६ मते
- चांदिवली मतदारसंघ : निकम यांना ९८,६६१ मते, गायकवाड याना १,०२,९८५ मते
- वांद्रे पश्चिम मतदारसंघ : निकम यांना ७२,९५३ मते, गायकवाड यांना ६९,३४७ मते
- कुर्ला पश्चिम मतदारसंघ : निकम यांना ५८,५५३ मते, गायकवाड यांना ८२,११७मते
- कलिना मतदारसंघ : निकम यांना ५१,३२८ मते, गायकवाड यांना ६७,६२० मते
- वांद्रे पूर्व मतदारसंघ : निकम यांना ४७,५५१ मते, गायकवाड यांना ७५,०१३ मते (Ashish Shelar)
उमेदवारांना झालेले मतदान
- वर्षा गायकवाड, काँग्रेस : ४ लाख ४५ हजार ५४५
- उज्ज्वल निकम, भाजपा : ४ लाख २९ हजार ०३१
- संतोष आंबुरगे, वंचित : ८ हजार २८८
- आयुब अमिन हंगुंड, बसपा : ३ हजार २४२
- नोटा : ९ हजार ७४९ (Ashish Shelar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community