भाजपा हा पक्ष हिंदू सण सुरू ठेवणारा, जोपसणारा, वाढवणारा पक्ष आहे. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेप्रमाणे आम्ही हिंदू सण बंद करणारे नाही, अशी टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर केली. मुंबई भाजपातर्फे मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यामध्ये तब्बल १०२६ मंडळे सहभागी झाली आहेत. या मंडळाचे परिक्षण करण्यासाठी तज्ज्ञांची ३० पथके तयार करण्यात आली आहेत. मुंबई भाजपा कार्यालयाजवळून या पथकांच्या गाड्यांना आमदार आशिष शेलार यांनी झेंडा दाखवून रवाना केले. त्यावेळी ते बोलत होते.
ठाकरे सरकारने लालबाग राजाची परंपरा खंडीत केली
कोरोनाचे संकट टळल्यानंतर दहिहंडी उत्सव भाजपाने जोरदार साजरा केला, आता गणेशोत्सवात ही भाजपा हिरहिरीने सहभागी झाला आहे. कोराना काळात दुर्दैवाने माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेने १०० वर्षांची लालबागच्या राजाची परंपरा खंडित केली. अशा प्रकारे हिंदू सणांना विरोध करणारे आम्ही नाही. भाजपा सणांची परंपरा जोपासणारा पक्ष आहे, असा सणसणीत टोला आशिष शेलार यांनी लगावला. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी गणेशोत्सवानिमित्त मुंबईच्या सहा जिल्हयांचा दौरा सुरू केला असून रोज रात्री ९ ते १ वाजेपर्यंत ते मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना भेट देत आहेत.
(हेही वाचा cyrus mistry accident death : अपघाताची चौकशी करण्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आदेश)
Join Our WhatsApp Community