गोव्यात शिवसेनेचा पराभव अटळ! शेलारांचा राऊतांवर निशाणा

129

गोव्यातील निवडणुकीवरुन राजकारण चांगलच रंगलं आहे. नेत्यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गोव्यात आहेत, तर शिवसेनेकडून संजय राऊतही गोव्यात आहेत. आता, भाजप नेते आशिष शेलार यांनी संजय राऊत यांना लक्ष्य करत, गोव्यात शिवसेनेचा पराभव अटळ आहे, त्यांनी आपलं डिपाॅजिट वाचवलं तर, मी त्यांना चहा पाजेन अशी खोचक टीका केली आहे.

शेलारांना ऐकवला मुलमंत्र

गोव्यात शिवसेनेचा पराभव अटळ आहे. शिवसेनेचं तिथे डिपॉझिट जरी वाचलं, तरी मी संजय राऊत सांगतील तिथे चहा आणि जेवण देईल, असं ओपन चॅलेंज भाजप नेते अशिष शेलार यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना दिलं होतं. त्यावर राऊतांनी पलटवार केला आहे. शेलारांना मी नेहमीच चहा पाजतो, असं सांगतानाच डिपॉझिट जप्त झालं म्हणजे लढूच नये असं नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच मराठा साम्राज्याचा मूलमंत्रही शेलार यांना ऐकवला.

( हेही वाचा: देश ऊर्जा निर्मीतीतही आत्मनिर्भर व्हावा, उपराष्ट्रपतींचे आवाहन! )

पाटलांनीही लगावला होता टोला

यापूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही शिवसेनेवर निशाणा साधला होता. गोव्यात 2017 ला शिवसेना लढली तेव्हा 3 जागा लढवून त्यांना 792 मतं मिळाली. सर्व तीन जागांवर डिपॉझिट जप्त झालं. आता हे गोव्यात सरकार बनवणार, सरकार बनवणाऱ्यांना मदत करणार, तर उत्तर प्रदेशात शिवसेनेनं 57 जागा लढल्या. 88 हजार 752 मतं मिळाली. 11 कोटी मतदारांमध्ये 88 हजार 595 मतं मिळाली. 57 पैकी 56 जागांवर डिपॉजिट जप्त झालं. आता हे उत्तर प्रदेशात टिकैत यांना, अखिलेश यादवांना आवाहन करणार आहेत की आम्हाला सोबत घ्या, असा टोला पाटील राऊतांना लगावला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.