दिल्ली दौऱ्यावर असताना काँग्रेस नेत्यांच्या भेटी घेणाऱ्या, केंद्र सरकारला फुकाचे सल्ले देणाऱ्या, पत्रकार परिषदा घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांना तुम्ही आत्ता दिल्लीमध्ये ३ दिवस काँग्रेसची भांडी घासायला गेलात का असा खणखणीत सवाल भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष आ. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी बुधवारी (७ ऑगस्ट) केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते. बांगलादेशमधील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबाबत तोंड वर करून बोलण्याआधी सीएए च्या विरोधकांची साथ सोडा असाही प्रहार आ. शेलार यांनी ठाकरेंवर केला.
आ. आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीला शासकीय बैठकीला अथवा नीती आयोगाच्या बैठकीला गेले. महाराष्ट्राच्या हिताचा निधी आणायला गेले, तर इथे घरी बसून उद्धव ठाकरे टीका करतात की, मुख्यमंत्री दिल्लीला गुडघे टेकायला गेले.. दिल्लीश्वरांसमोर लोटांगण घालायला गेलेत… दिल्लीला नतमस्तक व्हायला गेलेत… दिल्लीश्वरांच्या चरणी माथा टेकवायला गेलेत… सह्याद्री दिल्ली समोर झुकणार नाही… मराठी माणूस दिल्ली समोर वाकणार नाही… ही सगळी वाक्यरचना आणि विधाने करणारे श्रीमान उद्धव ठाकरे आता दिल्लीतील काँग्रेसवाल्यांची भांडी घासायला गेलेत का? असा सवाल करीत आ. शेलार म्हणाले की, किंबहुना आमचा आरोपच आहे की, होय तुम्ही दिल्लीतला काँग्रेसवाल्यांची भांडी घासायलाच गेला आहात.
(हेही वाचा – Love Jihad : धर्मांध वासीफच्या छळाला कंटाळून हिंदु युवतीची आत्महत्या)
आ. शेलार (Ashish Shelar) पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे दिल्लीत महाराष्ट्राच्या हितासाठी गेलेले नाहीत. दिल्लीत जाऊन महाराष्ट्रातील युवकांना रोजगार आणू, अथवा अतिवृष्टी झाली आमचा शेतकरी मित्र अडचणीत आहे. राज्य शासनाने मदत केली पण अधिकची मदत केंद्राकडे मागू, अशा कुठल्याही विषयावर ना निवेदन, ना कुठली बैठक ना चर्चा. तसेच महिला भगिनींच्या विषयांमध्ये काही बैठक अथवा निवेदन सुध्दा घेऊन ते गेलेले नाहीत. त्यांच्या घरासमोर जेव्हा मराठा आरक्षण आंदोलक येऊन बसले तेव्हा ते म्हणाले होते की, मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) दिल्लीला निर्णय घेतला पाहिजे. मग का नाही आरक्षणाबाबत एखादे निवेदन घेऊन दिल्लीला गेलात?, असा सवालही आ. शेलार यांनी उपस्थितीत केला. उद्धव ठाकरे हे ना आरक्षणाच्या बाजूने ना महाराष्ट्राच्या बाजूने आहेत, ते दिल्लीला गेले तो कटोरा घेऊन गेले आहेत आणि काँग्रेसच्या दिल्लीश्वरांची भांडी घासायला गेले आहेत. तेही का? तर मला मुख्यमंत्री पदाची खुर्ची द्या…. मला जास्त जागा द्या… माझ्या पक्षाचा विचार करा … असा कटोरा घेऊन ते दिल्लीत गेलेत अशा शब्दांत त्यांनी टीका केली.
त्यांनी दिल्लीत जाऊन बांगलादेशचा मुद्दा काढलाय हिंदूंचा विषय काढला आहे. मुंबईत धारावीमध्ये हिंदू कार्यकर्ता आमचा मारला गेला, खून झाला. हिरव्या पिलावळीने माँब ब्लिचिंग केले. तर उरण मध्ये यशश्री शिंदे या तरुणीचा दाऊद नावाच्या आरोपीने खून केला. तुम्ही घरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या धारावीत ही गेला नाहीत आणि उरणला ही गेला नाहीत मग आमच्या नेत्यांना ढाक्याला जायचे सल्ले कसले देताय? असा सवाल त्यांनी केला. धार्मिक हिंसाचाराचे बळी ठरणाऱ्या बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील सहा धार्मिक अल्पसंख्याकांना भारताचं नागरिकत्व देणाऱ्या सीएए ला विरोध करणारे उबाठा हेच खरे हिंदूविरोधी आहेत. जेव्हा मोदी सरकारने ‘सीएए’ कायदा आणला तेव्हा उबाठा आणि काँग्रेसने विरोध केला आणि आज बांगलादेशातील हिंदूंचा कैवार घेत आहेत. मग का त्यावेळी सीएए ला विरोध केला? सीएए ला विरोध करणाऱ्या काँग्रेसला सोडा मग हिंदू विषयावर बोला. तुम्ही हिंदू विरोधी आहात, हिंदूंची माफी मागा अशा शब्दांत आ. शेलार (Ashish Shelar) यांनी हल्लाबोल केला.
(हेही वाचा – खासदार अरविंद सावंत यांच्या नावाने Bademian Restaurant ला लावला 12 लाखांचा चुना; 200 प्लेट बिर्याणी फस्त)
आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर
महाविकास आघाडीचे नेते एकमेकांचे फोन घ्यायला तयार नाहीत, महाविकास आघाडीमध्ये तिकीट वाटप, जागा वाटप तर सोडाच कुठल्या मुद्द्यावर एकवाक्यता दिसत नाही. काँग्रेसचे जे प्रभारी आहेत त्यांना संजय राऊत पत्रकार परिषदेत ओढत होते हळूहळू हे एकमेकांना ठोसे मारु लागतील. त्यामुळे जागा वाटपाच्या वेळीच महाविकास आघाडी फुटणार, असे भाकित आ. शेलार (Ashish Shelar) यांनी केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community