Ashish Shelar यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र; म्हणाले, बाळासाहेबांना पुरात…

72
Ashish Shelar यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र; म्हणाले, बाळासाहेबांना पुरात...
  • प्रतिनिधी

“बाळासाहेब ठाकरे जेव्हा २६ जुलैच्या पुरात अडकले होते, तेव्हा तुम्ही पाठ दाखवून पंचतारांकित हॉटेलात पळाला होतात. त्या घटनेचे वळ तुमच्या पाठीवर आणि आयुष्यावर खोल आहेत,” अशा शब्दांत भाजपा मुंबई अध्यक्ष व मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनाच्या मेळाव्यात केंद्र सरकार, गृहमंत्री अमित शाह, रा. स्व. संघ आणि भाजपावर टीका केली होती. यावर प्रत्युत्तर देताना आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप करत, त्यांची चांगलीच कानउघडणी केली.

शेलार यांनी आपल्या “एक्स” (माजी ट्विटर) अकाउंटवर पोस्ट करत म्हटले की, उद्धव ठाकरे यांचा जन्म १९६० चा आहे, त्यामुळे १९५१ साली स्थापन झालेल्या जनसंघाविषयी त्यांना काही माहिती असणे शक्य नाही. “१९८० साली दिल्लीत जनसंघ नेत्यांनी नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांचे वय २० वर्षे होते आणि ते फोटोग्राफी करण्यात दंग होते. त्यामुळे त्यांना भाजपाचा इतिहास आणि संघाचा कार्यभार समजणार कसा?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

(हेही वाचा – Bhandara Blast : स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत स्फोट ; १३ मृत, आकडा वाढण्याची शक्यता)

“अमित शाह यांच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही”

“अमित शाह यांनी भाजपा जगात नंबर एकचा पक्ष बनवला आहे, आणि तुम्ही त्यांच्यावर वळ उठविण्याची भाषा करता? पण आधी तुमच्या स्वतःच्या कृतींकडे पाहा. बाळासाहेब ठाकरे जेव्हा २६ जुलै २००५ च्या पुरात अडकले होते, तेव्हा तुम्ही मिठी नदीच्या पुराला पाठ दाखवून पंचतारांकित हॉटेलात पळून गेलात. त्या घटनेने तुमच्यावर कायमस्वरूपी व्रण उमटवले आहेत,” असा घणाघात शेलार (Ashish Shelar) यांनी केला.

“मुंबईच्या बट्याबोळासाठी जबाबदार”

मुंबईतील पायाभूत सुविधांच्या बट्याबोळाबाबत उद्धव ठाकरेंवर टीका करताना शेलार (Ashish Shelar) म्हणाले, “कंत्राटदारांकडून कटकमिशन घेत मुंबईचा बट्याबोळ तुम्ही केला आहे. त्याचे व्रण दोन कोटी मुंबईकरांच्या काळजावर आहेत. तुमच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या सुरकुत्या त्या चुकीच्या कामांची साक्ष देत आहेत. या जखमा खोल आहेत, त्या कधी आरशासमोर उभे राहून पाहा.”

(हेही वाचा – राज्यात Bird flu हातपाय पसरतोय ; गिधाडांपाठोपाठ आता बिबट्यांनाही झाली लागण)

उद्धव ठाकरेंवर घणाघात

शेलार (Ashish Shelar) यांच्या या वक्तव्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. “तुम्ही समाजवाद्यांची पुस्तके वाचून महाराष्ट्र आणि भाजपाचा इतिहास शिकण्याचा प्रयत्न करत आहात. पण संघाने शंभर वर्षे पूर्ण केले आहेत, आणि भाजपा हा जगातील क्रमांक एकचा पक्ष बनला आहे. त्यामुळे भाजपावर टीका करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या ज्ञानाची पुन्हा तपासणी करा,” असा सल्ला त्यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.

आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या या टिकेने शिवसेना उबाठा आणि भाजपा यांच्यातील वाद अधिकच चिघळला आहे. ठाकरे यांच्या विधानांना शेलारांनी दिलेले प्रत्युत्तर हे भाजपाची ताकद दर्शवणारे असून यामुळे आगामी राजकीय वातावरण तापणार, हे निश्चित आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.