धारावीतला ३७ एकर भूखंड गिळंकृत करण्याचा उद्धव ठाकरेंचा डाव; Ashish Shelar यांचा हल्लाबोल

92
धारावीतला ३७ एकर भूखंड गिळंकृत करण्याचा उद्धव ठाकरेंचा डाव; Ashish Shelar यांचा हल्लाबोल
  • प्रतिनिधी

धारावी पुनर्विकास प्रकल्पाची पुनर्निविदा काढून ३७ एकरचा भूखंड गिळंकृत करण्याचा उद्धव ठाकरेंचा डाव असून त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या वनस्पती आणि प्राणीप्रेमासाठी हे षडयंत्र रचले जात आहे. आशियातील सगळ्यात मोठ्या झोपडपट्टीत (धारावी) मरणयातना भोगणाऱ्या गोरगरिबांना चांगली घरे मिळताहेत, हे त्यांना बघवत नाही. त्यामुळेच मुंबईच्या सुनियोजित विकासाला ते विरोध करीत असल्याची घणाघाती टीकेचा पुनरूच्चार भाजपाचे मुंबई अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी गुरुवार (७ नोव्हेंबर) पत्रकारांशी बोलताना केला.

महाविकास आघाडीच्या संयुक्त सभेत उद्धव ठाकरेंनी धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून केलेल्या आरोपांनाही शेलार (Ashish Shelar) यांनी यावेळी जोरदार प्रत्युत्तर दिले. धारावीचा पुनर्विकासाचा उल्लेख आघाडीच्या पंचसूत्रीत नसला तरी आज उद्धव ठाकरे यांनी वचननामा जाहीर करून धारावीबाबत भूमिका मांडली. म्हणजे ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे का? ती आघाडीची भूमिका नाही का? याचे स्पष्टीकरण ठाकरेंनी व मविआच्या नेत्यांनीही द्यावे. नाहीतर कुणीतरी स्क्रीप्ट लिहून दिली आणि ते बोलले, असाच याचा अर्थ निघतो असा आरोपही त्यांनी केला.

(हेही वाचा – BMC : महापालिका विधी खात्याची आयुक्तांनी ऐकून घेतली बाजू, दिले ‘हे’ निर्देश)

अदानीला जागा देण्याचे सरकारी निर्णय म्हणजे फेक नेरेटिव्ह आहे का? हे उद्धव ठाकरे यांचे वाक्य म्हणजे फेकमफाक असल्याचा टोला शेलार (Ashish Shelar) यांनी लगावला. याविषयी सत्य परिस्थिती मांडताना ते म्हणाले, राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘डीआरपी’ अर्थात धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टला जागा देण्याचे ठरले. ही संस्था १०० टक्के सरकारच्या मालकीची आहे. मग अदानीला जागा दिल्याचा मुद्दा कुठून आणला? सातबारावर अदानीचे लावले किंवा तसा प्रस्ताव तयार केल्याचा एकतरी पुरावा उद्धव ठाकरेंनी द्यावा. पण, ते देऊ शकणार नाहीत. कारण ते फेकमफाक करीत असल्याचाही सणसणीत टोला शेलार यांनी लगावला.

मुळात धारावीच्या पुनर्विकासाला अतिरिक्त जागा द्यायला लागली तर द्यावी, असे प्रावधान उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असतानाच केले होते. त्यामुळे त्यांनी फेकमफाक करण्यापेक्षा या प्रश्नाचे उत्तर आधी द्यावे. कारण देवनार कचराभूमीच्या ठिकाणी प्रक्रिया करून तयार होणारी जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला देण्यास तुमचा विरोध का? धारावीत आम्ही आंतरराष्ट्रीय वित्तीय पार्क उभारणार असल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केला. मात्र असे आंतरराष्ट्रीय ठराव आणायला आधी केंद्र सरकारचा ठराव लागतो. अद्याप तुम्ही राज्यातील सत्तेपासून कोसो दूर आहात, मग जे तुमच्या अखत्यारित नाही, त्याबद्दल का बोलता? त्यामुळे धारावी पुनर्विकासाच्या बाबतीत दिलेले आश्वासन म्हणजे लबाडा घरचे जेवण असल्याचे आमचे मत स्पष्ट आहे, असाही आरोप त्यांनी यावेळी केला. (Ashish Shelar)

(हेही वाचा – Assembly Election : प्रत्येक मतदान केंद्रावर निश्चित किमान सुविधा; ‘स्वीप’ उपक्रमाच्या अंमलबजावणीचा वेग वाढवण्याचे निर्देश)

आता काँग्रेसला जोडे मारणार का?

जम्मू काश्मिरच्या विधानसभेत नॅशनल कॉन्फरन्स आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या काँग्रेसने त्या राज्याला विशेष दर्जा मिळावा, असा ठराव आणला. तो एकतर्फी मंजूर करण्याचा प्रयत्न केला. खरेतर त्यात कलम ३७० आणि ३५ (अ) यांचा उल्लेख नाही. तरीही ज्या पद्धतीचा ठराव आणण्यात आला, तो पूर्णतः बेकायदेशीर आहे. भाजपाने विधानसभेत त्याला कडाडून विरोध केला. काँग्रसचे त्याला समर्थन दिले आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे या काँग्रेसला जोडे मारणार का? याबाबत भूमिका स्पष्ट करा, अशी जाहीर मागणी करत कोणताही कायदेशीर आधार नसलेला अशाप्रकारचा ठराव मांडून अशांतता पसरवण्याचा प्रयत्न ‘इंडी’ आघाडी करीत असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

महाराष्ट्रातसुद्धा असे वातावरण तयार करण्याचा मविआचा मनसुबा असून त्यामुळेच शहरी नक्षलवाद्यांची भाषा उद्धव ठाकरेंच्या तोंडी यायला लागली आहे. त्यामुळे हळूहळू उरला सुरलेला शिवसैनिक उद्धव ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ ऐवजी ‘लाल सलाम’ करण्याच्या तयारीत असल्याचा टोलाही शेलार (Ashish Shelar) यांनी लगावला.

(हेही वाचा – राहुल गांधी अफू घेऊन गलिच्छ लिखाण करतात; Udayanraje Bhosale यांची टीका!)

कोळी बांधवांची माथी भडकवू नका..

शहरातील कोळीवाडे आणि गावठाणांवर महायुती सरकारची वक्रदृष्टी आहे आणि या परिसरात क्लस्टर डेव्हलपमेंट करण्याचा घाट सत्ताधाऱ्यांनी घातला आहे. म्हणजेच सर्वांना एकत्र करून टॉवर बांधायचे आणि बाकीची जमीन आपल्या मित्राच्या घशात घालण्याचा महायुतीचा विचार आहे, या उद्धव ठाकरे यांनी केल्या आरोपाला सडेतोड प्रत्युत्तर देताना शेलार (Ashish Shelar) म्हणाले, “कोळीवाड्यांचे सीमांकन करण्याचे काम महायुतीच्या सरकारने केले. त्यामुळे उगाच आमच्या कोळी बांधवांची माथी भडकवू नका. उद्धव ठाकरे यांच्या काळात वरळी कोळीवाड्याला झोपडपट्टी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे उगाच फेकमफाक करून नका”, असाही टोला शेलार (Ashish Shelar) यांनी लगावला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.