पालिकेच्या शाळांना इंग्रजी नाव देणारे मराठीचे कैवारी कसे? शेलारांचा सवाल

109

मुंबईत पंधरा वर्षे एक हाती शिवसेनेची सत्ता असताना मुंबईच्या महानगरपालिकेच्या २२१ मराठी अनुदानित शाळा बंद पडल्या. एस एस सी बोर्डाऐवजी सीबीएससी बोर्ड आणले. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांना नाव दिलं मुंबई पब्लिक स्कूल मग तुम्ही मराठीचे कैवारी कसे? असा सवाल करीत आशिष शेलार यांनी महापालिकेतील शिवसेनेच्या कारभारावर जोरदार टीका केली.

मुंबईतील गिरण्यांचे भोंगे कुणी बंद केले? गिरण्यांच्या जागांसाठी नियमावली कुणी बदलली? गिरणी कामगार कुठे गेला? कोळीवाडे गावठाणांची स्वतंत्र नियमावली कोणी रोखली? असे अनेक प्रश्न उपस्थित करीत नटसम्राट नाटकातील आप्पा बेलवलकरांप्रमाणे मुंबईतील मराठी माणूस शिवसेनेला विचारतोय टू बी ऑर नॉट टू बी ? त्याला शिवसेना सांगतेय “तो मी नव्हेच” अशी खोचक टीका भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी केली आहे.

( हेही वाचा : देशमुख, मलिकांनंतर आता सोमय्यांच्या टार्गेटवर ‘या’ मंत्र्याचा नंबर! )

काय म्हणाले आशिष शेलार?

वरळी कोळीवाड्यात शुक्रवारी भाजपातर्फे मराठी कट्ट्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार सुनील राणे आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शेलार म्हणाले की, भाजपाची सत्ता असताना मुंबईतील गावठाण आणि कोळीवाड्यांचे सीमांकन झालं पण सरकार बदललं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार गेले आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार आले, त्यानंतर सीमांकन बंद झालं. एवढंच नाही तर गावठाण आणि कोळीवाड्यात राहणाऱ्यांचा परिवार वाढला मुलं मोठी झाली, मुंबईबाहेर घर घेण्याची ऐपत आहे म्हणून घर वाढवायचे असेल तर परवानगी मिळत नाही, घर दुरुस्ती करता येत नाही. महापालिका अधिकारी लगेच हातोडा घेऊन येतात. दुरुस्ती व देखभाल करायची असेल तर साधा नियम सुद्धा नाही त्यासाठी आम्ही संघर्ष करतोय पण सरकार परवानगी देत नाही. असा आरोप आशिष शेलारांनी केला आहे. दुसरीकडे कोळीवाडे गावठाणांना झोपडपट्टी जाहीर करण्यात आले ही वस्तुस्थिती समजून घ्या, असे आवाहन त्यांनी केले. तशीच परिस्थिती मच्छीमार महिलांची आहे. त्यांना मच्छीमार्केट मध्ये लायन्स दिले नसून, त्यांच्यासाठी नियमही बनवले नाहीत. वरळी कोळीवाड्यातील मच्छीमार कोस्टल रोडमुळे त्यांची मासेमारी कशी धोक्यात आली आहे हे सांगून आंदोलन करीत आहेत पण वरळीचे आमदार आणि पर्यावरण मंत्र्यांना त्यांना भेटायला वेळ नाही असेही ते म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.