राष्ट्रवादीने सुनील पाटीलशी संबंध गुमान कबुल करावेत, अन्यथा…

राज्यातील प्रोटेक्शन मनी चिंकू पठाण करत होता. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, असेही शेलार म्हणाले.

आम्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांना संधी देत आहोत, त्यांनी गुमानपणे सुनील पाटीलसोबत काय संबंध आहेत हे कबुल करावे. बऱ्याच गोष्टी आमच्या हाती लागल्या आहेत. त्यामुळे बाथरुमच्या आत शौचगृह असते, तिथूनही तोंड दाखवता येणार नाही, असा घणाघात भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केला.

हा सुनील पाटील आर.आर. पाटील यांचे नाव बदनाम करत आहे. आज ते हयात नाहीत. त्यांच्याबद्दल बोलणे योग्य नाही. सुनील पाटील आबांचे नाव घेत आहेत. राष्ट्रवादीची आग मस्तकात जात नाही का? सुनील पाटील तुमचा सदस्य आहे का? त्यावर तुमचे उत्तर काय? धुळ्याचे सुनील पाटील यांच्याशी राष्ट्रवादीचा थेट संबंध काय?, अशी प्रश्नाची सरबत्ती शेलार यांनी केली.

(हेही वाचा : ललित हॉटेलमधील शराब, शबाब, कबाबच्या पार्ट्यांशी राष्ट्रवादीचा काय संबंध?)

सीबीआय चौकशी करा

आर्यन खान प्रकरणात सुनील पाटील नावाची व्यक्ती मास्टरमाइंड असल्याचे उघड झाले आहे. सुनील पाटील यांचा संबंध राष्ट्रवादीशी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी केली गेली पाहिजे. सुनील पाटील यांनी आर.आर पाटील यांचे नाव घेतले. आताचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे नाव देखील घेतले जात आहे. त्यामुळे सुनील पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून चौकशी करावी, अशी आमची मागणी आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यासाठी परवानगी द्यावी. परवानगी दिली नाही तर मग सरकारचे हात काळे आहेत हे स्पष्ट होईल, असा दावाही शेलार यांनी केला.

किरण गोसावी प्रकरणही सीबीयाकडे द्या

किरण गोसावी प्रकरण सीबीआयला देण्यात यावे. चिंकू पठाण दाऊदचा हस्तक आहे. त्याच्यासोबत माजी गृहमंत्री अनिल देशमुख सह्याद्री अतिथीगृहात बैठका घेतात. ही गंभीर बाब आहे. राज्यातील प्रोटेक्शन मनी चिंकू पठाण करत होता. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, असेही शेलार म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here