Ashish Shelar: जरांगेंच्या आरोपांवर आशिष शेलारांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले…

मराठा समाज राजकारणाविरहित राहून समाजाला न्याय मिळण्याच्या दृष्टीने आग्रही आहे. याबाबतीत राजकारण करता कामा नये', असा इशारावजा सल्ला आशिष शेलार यांनी दिला आहे.

343
सामनातील पंतप्रधानांच्या टीकेवरुन Ashish Shelar यांचा राऊतांवर पलटवार

मनोज जरांगे-पाटलांनी देवेंद्र फडणवीसांवर प्रचंड गंभीर आरोप केले आहेत. अधिवेशनादरम्यान भाजपने मराठा आरक्षणाला समर्थन दिले आहे. समाज जे मागतोय त्या बाबींची कायदेशीर प्रक्रिया होणे आवश्यक आहे. आंदोलनादरम्यान अधिवेशनात भाजपने मराठा आरक्षणाला समर्थन दिले आहे. आधीदेखील देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला न्यायिक आरक्षण दिले होते. त्यामुळे अशा व्यक्तिवर बिनबुडाचे आरोप करणे, आम्हाला मान्य नाही, अशा शब्दांत जरांगे पाटील यांच्या आरोपांवर भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मत व्यक्त केले आहे.

‘समाजाला न्याय मिळवून देऊ हीच सरकारची भूमिका आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाजवळ शपथ घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला १० टक्क्यांचे टिकणारे आरक्षण दिले आहे. अन्य जे प्रलंबित विषय आहेत. ते विषय चर्चेने सोडवले जाऊ शकतात. या साऱ्या गोष्टींना राजकीय रंग देणे, मराठा समाजाला मान्य नाही. मराठा समाज राजकारणाविरहित राहून समाजाला न्याय मिळण्याच्या दृष्टीने आग्रही आहे. याबाबतीत राजकारण करता कामा नये’, असा इशारावजा सल्ला आशिष शेलार यांनी दिला आहे.

(हेही वाचा – Veer Savarkar: वीर सावरकर यांच्या ५८व्या आत्मार्पणदिनानिमित्त ‘संगीत उत्तरक्रिया’ नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग सादर)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.