राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगेलेली असताना आता भाजपा आमदार आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने विविध तर्क वितर्क लावले जात आहेत. भाजपाचे आमदार अँड. आशिष शेलार यांनी नरिमन पाँइंट येथील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची आज भेट घेतली. मात्र क्रिकेट व अन्य काही विषयांच्या संदर्भात ही भेट असल्याचे स्पष्टीकरण आशिष शेलार यांनी दिले.
With Shri.@ShelarAshish pic.twitter.com/j2nj7KUqcE
— Supriya Sule (@supriya_sule) August 11, 2020
चव्हाण सेंटरमध्ये आशिष शेलार व शरद पवार यांच्यामध्ये बराच वेळ चर्चा झाली. ही भेट आटोपून शेलार खाली उतरले तेव्हा सेंटरच्या आवारातच त्यांची भेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रीया सुळे यांच्याशी झाली. सुप्रीया सुळे यांनी या भेटीचा फोटो व्टिट केला. मात्र या भेटीच्या संदर्भात पत्रकारांशी बोलताना शेलार म्हणाले की, राजकारण सोडूनही भेटी होतात हाच राजस्थान व महाराष्ट्रात फरक आहे. त्या ठिकाणी एकाच पक्षातील लोक इतरी भांडतात की भेटायलाही तयार होत नाही. पण महाराष्ट्रात विरोधी पक्षात असलेले लोकही सहजपणे भेटतात हाच महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा आहे.
ती फक्त अफवाच
दरम्यान राष्ट्रवादीचे १२ आमदार भाजपाच्या वाटेवर असल्याच्या अफवा काही जण पसरवत आहेत. हे वृत्त निराधार आणि कपोलकल्पित आहे. उलट निवडणुकीआधी भाजपमध्ये गेलेले आमदार राष्ट्रवादीमध्ये परतण्यास उत्सुक आहेत. मात्र यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. याविषयी लवकरच निर्णय घेऊन घोषणा करण्यात येईल” अशी माहिती नवाब मलिक यांनी ट्विटरवरुन दिली.
Join Our WhatsApp Communityकाही लोक राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे १२ आमदार भाजपात जाण्याची अफवा पसरवत आहे.हे वृत्त खोटं आहे.उलट निवडणुकीआधी भाजपात गेलेले आमदार राष्ट्रवादी काँगेस पक्षात येण्यास उत्सुक आहेत.पण यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.#Maharashtra pic.twitter.com/DVejy4hpax
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) August 10, 2020