आमच्या कमळाला ‘बाई’ म्हणत हिणवता, आम्ही तुम्हाला पेंग्विन सेना म्हणायचं का? शेलारांचे उद्धव ठाकरेंना पत्र

105

भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहित आमच्या कमळाला ‘बाई’ म्हणत हिणवता, आम्ही तुम्हाला पेंग्विन सेना म्हणायचं का? असा सवाल विचारला आहे. शेलारांनी हे पत्र ट्वीट करत हा प्रश्न केला आहे.

( हेही वाचा : Asia Cup 2022 : रविवारी पुन्हा एकदा रंगणार भारत-पाकिस्तान लढतीचा थरार; असे असेल सुपर ४ चे शेड्युल )

शिवसेनेला प्रतिउत्तर 

झारखंड, दिल्लीमध्ये ऑपरेसन लोटसचा प्रयत्न फसल्यानंतर भाजप अर्थत कमळाबाईची वाईट नजर आता कॉंग्रेसवर पडली आहे. पक्षांतर्गत असलेल्या नारजीच्या फायदा घेत महाराष्ट्रात कॉंग्रेसमध्ये फूट पाडण्याची हातघाई भाजपकडून सुरू आहे अशी टीका शिवसेनेने सामनातून भाजपावर केली आहे. यावरून भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला प्रतिउत्तर दिले आहे.

आशिष शेलारांचे ट्वीट

“आपण आमच्या कमळाला हिणवायला बाई म्हणताय? हरकत नाही, बाईमध्ये आई, ताई आणि कडक लक्ष्मीपण आहे. त्यामुळे तुमच्या उरल्या सुरल्या पक्षाला, आम्ही आता पेंग्विन म्हणायचे का? ता.क. असे कडक अस्सल मुंबईकर शब्द आमच्याकडे पण आहेत!” असे ट्वीट करत शेलारांनी इशारा दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.