राणे म्हणतात फडणवीस हिंदुहृदयसम्राट, पण आशिष शेलारांचे मत काय?

158

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन भाजपकडून कायमंच उद्धव ठाकरे गटावर टीका करण्यात येते. त्यातच आता भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख हिंदुहृदयसम्राट असा केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडून राणेंवर टीका होत असतानाच आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी याबाबत स्पष्ट विधान केले आहे.

काय म्हणाले शेलार?

नितेश राणे यांनी जे विधान केले आहे त्याचे उत्तर ते स्वतः देतील. पण समाजमनामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हे हिंदुहृदयसम्राट आहेत. त्यांच्यानंतर बाळासाहेब ठाकरे आहेत आणि या दोघांच्या विचारांनी तयार झालेल्या मार्गावर देवेंद्र फडणवीस चालत आहेत, हे अगदी सत्य आहे, असे विधान मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केले आहे.

नितेश राणेंचे विधान

राज्यात सध्या हिंदुत्ववादी विचारांवर मार्गक्रमण करणारे सरकार कार्यरत आहे. या सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रखर हिंदुत्ववादी विचारांचे नेते आहेत तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हिंदुहृदयसम्राट आहेत, असे वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी शनिवारी केले होते. जो जो हिंदूचे रक्षण करतो, हिंदूच्या हृदयात आहे त्यांना हिंदुहृदयसम्राट नाही म्हणायचे, तर काय म्हणायचे, असा सवालही नितेश राणे यांनी केला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.