भाजपाने त्यांच्या राष्ट्रीय पातळीमध्ये बदल केला असून त्यामध्ये नव्या चेहर्याना संधी देण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, चित्रा वाघ आणि हिना गावित यांना पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. अशा रीतीने भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ८० सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. ज्यामध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्य, प्रवक्ते, सचिव, कार्यालयीन सचिव आणि कोषाध्यक्षांपासून ते राज्य प्रभारींचाही समावेश आहे. या कार्यकारिणीत महाराष्ट्रातून एकूण १५ जणांचा समावेश आहे. त्यात चार नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
शेलार, मुनंगटीवार पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावर
राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर, डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, चित्रा वाघ यांचा समावेश करण्यात आला आहे. तर, राष्ट्रीय सचिव म्हणून महाराष्ट्रातून विनोद तावडे, सुनील देवधर, पंकजा मुंडे यांचा समावेश कायम आहे. तर विशेष निमंत्रितांमध्ये सुधीर मुनंगटीवार, आशिष शेलार, लड्डाराम नागवाणींचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून सुनील वर्मा, हिना गावित यांची वर्णी लागली आहे. माजी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश करण्यात आला आहे. राज्य प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांना कायम ठेवण्यात आले आहे.
(हेही वाचा : चित्रा वाघ बनल्या राष्ट्रीय नेत्या! ‘ही’ मिळाली जबाबदारी!)
Join Our WhatsApp Community