भारतीय जनता पक्ष सकाळच्या ९.३० वाजताच्या पत्रकार परिषदेला घाबरतात, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले होते. त्यालाच प्रत्युत्तर देताना भाजप आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊतांवर बोचरी टीका केली. यावेळी शेलार यांनी संजय राऊतांचा उल्लेख सीरियल किलर म्हणून केला.
नक्की काय म्हणाले आशिष शेलार?
माध्यमांसोबत बोलताना आशिष शेलार म्हणाले की, ‘रात्री ९.३० वाजता लोकं टीव्ही लावतात, तेव्हा ते सीरियल पाहतात. आणि सकाळी ९.३० वाजता टीव्ही बंद करतात, कारण सीरियल किलर वेड्यासारखा बडबडतो.’
तसेच संजय राऊतांच्या लोकशाही धोक्यात आहे या वक्तव्याला देखील शेलार यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, ‘लोकशाही धोक्यात आहे, अशा स्वरुपाचा गैरप्रचार संजय राऊतांनी करू नये. संविधानामुळे ते जामिनावर आहेत. या भारतामध्ये संविधान किती मजबूत आहे, याचे उदाहरण त्यांचा जामीन आहे. आजकाल आम्ही पाहतोय बरेच दिवस मी बोलणारही होतो, काही लोकांना अंतरिम सुरक्षा ही प्रत्येक तारखेला वाढवून मिळतेय ज्यामध्ये मुश्रीफ आणि अनिल परब विशेष आहेत. आम्ही कुठल्याही न्यायालयावर टीका करणार नाही, जे संजय राऊतांनी केले. पण जे अंतरिम सुरक्षांचे कवच दिवसेंदिवस वाढतेय, याच्यावरही आमचे बारीक लक्ष आहे.’
(हेही वाचा – राहुल गांधींनी महाराष्ट्रात पाऊल ठेवण्यापूर्वी माफी मागावी, अन्यथा…; चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा)
Join Our WhatsApp Community