ठाकरे सरकार कोळी, आगरी बांधवांना उद्ध्वस्त करतेय!

ठाकरे सरकार आणि मुंबई महापालिकेतील सत्ताधारी मूळ मुंबईकर असलेल्या कोळी, आगरी बांधवांना उद्ध्वस्त करत आहे. मुंबईचे मूळ रहिवासी असलेल्या कोळी बांधवांना हक्काचे घर मिळावे, कोळीवाडे, गावठाणांचा पुनर्विकास व्हावा म्हणून स्वतंत्र डिसीआर (विकास नियंत्रण नियमावली) केला नाही, असा आरोप भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केला.

वरळी येथील कोळी बांधव कोस्टल रोडबाबत आमचे म्हणणे समजून घ्या म्हणून वारंवार सरकारला विनंती करीत आहेत.  याबाबत सरकार आणि पालिकेने संयुक्त बैठक घेतली, पण त्यामध्ये सुध्दा कोळी बांधवांचे म्हणणे ऐकून न घेताच आपलाच मुद्दा रेटण्यात आला. मूळ मुंबईकर असलेल्या समुद्राच्या लाटा झेलणाऱ्या या आमच्या दर्यावर्दींना उद्ध्वस्त कराल, तर आई एकविरेची शपथ, खबरदार, अशा शब्दांत भाजपा नेते आमदार अँड. आशिष शेलार यांनी इशारा दिला.

( हेही वाचा : मध्य रेल्वेच्या ‘या’ स्थानकांवर थांबणार नाही लोकल! कारण… )

आशिष शेलारांचा सरकारला इशारा

500 चौरस फुट घरांचा मालमत्ता कर माफ केला, पण त्याचा फायदा आमच्या कोळी बांधवांना होणार नाही. चक्रीवादळात त्यांना मदत केली नाही. समुद्राचे पाणी गोडे करुन मूळ मुंबईकर आगरी, कोळी बांधवांचे समूळ उच्चाटन तुम्ही करणार?कोस्टल रोडसाठी बैठकांचे नाटक करुन स्वतःचेच खरे करायला निघालात काय? म्हणून हा इशारा समजा, समुद्राच्या लाटा झेलणाऱ्या या आमच्या दर्यावर्दींना उद्ध्वस्त कराल, तर आई एकविरेची शपथ, खबरदार, अशा शब्दांत त्यांनी सरकारला इशारा दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here