अयोध्येतील श्रीराम मंदिर लढ्याविषयी उबाठाचे नेते संजय राऊत यांनी एक व्हिडीओ ट्विट करत तथाकथित राम भक्तांसाठी ही ‘स्मरण गोळी’ असे म्हटले. त्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली. त्यांनी तथाकथित राम भक्तांसाठी ही ‘स्मरण गोळी’ असे राऊत यांनी म्हटले आहे. त्यावर भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली.
श्रीमान संजय राऊत…
अहंकार, विस्मरण असे आजार आपल्याला झालेत.
कारण…◆ विशाल ह्रदयाच्या हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान, विचार, पक्ष आणि राजकीय वारसदार आदी सगळे मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत आलेल्या शिवसैनिकांकडे आहेच.
◆ ते रामाला मानतात… https://t.co/Yvkjrp0aVF
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 3, 2024
काय म्हणाले संजय राऊत?
शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी ट्विटरवरून एक व्हिडिओ क्लिप पोस्ट केला. त्यामध्ये माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, माजी केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विविध वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीचे अंश आहेत. त्यातून शिवसेनेच्या लोकांनीच बाबरी मशीद पाडली, असे संजय राऊत यांना सुचवायचे असून त्यांनी तथाकथित राम भक्तांसाठी ही “स्मरण गोळी”, असा मजकूर या पोस्टसोबत जोडला.
काय म्हणाले आशिष शेलार?
आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले, “श्रीमान संजय राऊत… अहंकार, विस्मरण असे आजार आपल्याला झालेत. कारण… विशाल ह्रदयाच्या हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान, विचार, पक्ष आणि राजकीय वारसदार आदी सगळे मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत आलेल्या शिवसैनिकांकडे आहेच. ते रामाला मानतात आणि पंरपराही जोपासतात.”
(हेही वाचा Shri Malang Gad : श्री मलंगगडला मुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा )
“त्यामुळे प्रश्न हा उरतोच की, शिल्लक राहिलेल्या तुमच्या सारख्या कोत्या मनाच्या उबाठा गटाचा राम मंदिराशी संबंध काय? मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी काँग्रेस, शरद पवार आणि समाजवादीशी हात मिळवणी केलीत ना? एकदा तुमचे हात स्वच्छ पाण्यात बुडवून पहा… कोठारी बंधूचे रक्त स्पष्ट तुम्हाला दिसेल! म्हणून लक्षात ठेवा… बघा आम्हाला बोलायला लावू नका… बरेच शिल्लक आहेत आमच्याकडे अस्सल डोस भगवे तुम्ही भर चौकात होऊ शकता हं नागवे!”, असेही आशिष शेलार (Ashish Shelar)
Join Our WhatsApp Community