भारतीय जनता पक्षाने (Bharatiya Janata Party) राज्यसभेसाठी उमेदवारी देऊन माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यांचा हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी म्हटले आहे. (Ashok Chavan)
भाजपच्या राज्यसभा उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. ही संधी दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah), भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis), भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले. या संधीचा उपयोग मी राज्यात भाजपचे संघटन अधिक वाढविण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासाबाबत सर्वसामान्यांच्या अपेक्षा संसदेत मांडण्यासाठी करेल. (Ashok Chavan)
(हेही वाचा – CM Gram Sadak Yojana: मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत आणखी 7 हजार किमी रस्ते व पूल बांधणार)
यापूर्वी मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासह दोन वेळा लोकसभा सदस्य म्हणून काम केले आहे. माझा आजवरचा प्रशासकीय व संसदीय कामकाजाचा अनुभव मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्राचे प्रश्न सोडविण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी यावेळी म्हणाले. राज्यसभेसाठी भाजपचे अन्य दोन उमेदवार मेधाताई कुलकर्णी व डॉ. अजित गोपछडे यांचे अभिनंदन करताना नांदेडला एकाचवेळी राज्यसभेचे दोन खासदार मिळणे, हा नांदेडकरांसाठी भाजपने दिलेला बोनस असल्याचे त्यांनी सांगितले. (Ashok Chavan)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community