Ashok Chavan : आमचे स्टार मिसमॅच होतात; नारायण राणे यांच्या राज्यसभेविषयी काय म्हणाले अशोक चव्हाण

351
Ashok Chavan : आमचे स्टार मिसमॅच होतात; नारायण राणे यांच्या राज्यसभेविषयी काय म्हणाले अशोक चव्हाण
Ashok Chavan : आमचे स्टार मिसमॅच होतात; नारायण राणे यांच्या राज्यसभेविषयी काय म्हणाले अशोक चव्हाण

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी 12 फेब्रुवारी रोजी काँग्रेस सदस्यत्व व आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांनी कॉंग्रेसची ४० वर्षांची साथ सोडून भाजपचे कमळ हाती घेतले आहे. दुसऱ्याच दिवशी त्यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपने 14 फेब्रुवारी रोजी त्यांना राज्यसभेची (Rajya Sabha) उमेदवारी दिली. यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची राज्यसभेची संधी गेली आहे. अशोक चव्हाण यांच्यामुळे नारायण राणे यांचा उमेदवारीचा पत्ता कट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी राणे व आपले स्टार कुठेतरी मिसमॅच होत असल्याची भावना व्यक्त केली आहे.

(हेही वाचा – Manoj Jarange-Patil: तुम्हाला आमच्या बाजूने बोलताना स्वाभिमान वाटला पाहिजे, नारायण राणेंच्या टीकेला जरागेंनी दिलं प्रत्युत्तर)

हा केवळ योगायोग

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत असतांना मी मुख्यमंत्री झालो. आता पुन्हा त्यांचे नाव राज्यसभेसाठी चर्चेत असतांना मला उमेदवारी मिळाली. हा केवळ योगायोग आहे. माझ्या मते आमच्या दोघांचे स्टार कुठेतरी मिसमॅच होत आहेत, असे अशोक चव्हाण म्हटले आहे.

अशोक चव्हाण पुढे म्हणाले की, नारायण राणे यांचा बऱ्याच वर्षांनी परवा मला फोन आला होता. भाजपत आल्याबद्दल त्यांनी माझे अभिनंदन केले. त्यामुळे माझे येणे आणि त्यांची राज्यसभा जाणे यात कोणताही संबंध नाही.

शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसमध्ये काम केले

मला राज्यसभेवर पाठवण्याचे ठरले होते, असे मी म्हणणार नाही. माझ्या अनुभवाचा फायदा राज्यसभेत व्हावा, असे त्यांना वाटले असेल. त्यामुळेच त्यांनी मला संधी दिली असेल. मी शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसमध्ये काम केले. मी 2 वर्षांपूर्वी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला नाही. मी शेवटच्या दिवशी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा बैठक घेतली आणि सायंकाळी गाडी पकडून मुंबईला आलो. पक्षाला अधिक वेळ देण्यासाठी त्यांनी मला राज्यसभेवर पाठवले. त्यांना मी मराठवाड्यात प्रचार करावा, असे वाटते. त्यात काहीही गैर नाही, असे भाजपप्रवेशाविषयी चव्हाण (Ashok Chavan) यांनी सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.