माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचा आज मंगळवार १३ फेब्रुवारी भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला. दुपारी एक वाजेनंतर हा पक्षप्रवेश झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या उपस्थित हा पक्षप्रवेश झाला. यावेळी अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान मोदींच्या कामाचे कौतुक केले. तसेच आदर्श घोटाळ्यामुळे अशोक चव्हाण भाजप सोबत गेले अशी टीका करणाऱ्या विरोधकांनाही त्यांनी उत्तर दिले.
(हेही वाचा – Ashok Chavan आज भाजपमध्ये प्रवेश करणार)
नेमकं काय म्हणाले अशोक चव्हाण ?
मला (Ashok Chavan) कुणावरही व्यक्तिगत टीका टिपण्णी करायची नाही. मी काँग्रेसमध्ये असताना प्रामाणिकपणे काम केले आणि पक्षाने देखील मला खूपकाही दिले.पण पक्षासाठी मीही योगदान दिलं आहे. त्यामुळे, महाराष्ट्रात पक्षाला ताकद मिळाली. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाने प्रभावित झालो आहे. देशाच्या विकासासाठी त्यांनी (मोदींनी) महत्त्वाच्या योजना राबवल्या आणि विकसित भारताचे स्वप्न ते बघत आहेत. अशा शब्दांमध्ये अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान मोदींच्या कामाचे कौतुक केले. (Ashok Chavan)
(हेही वाचा – Ashok Chavan : आजपासून राजकीय प्रवासाची नवीन सुरुवात)
पुढे बोलताना ते (Ashok Chavan) म्हणाले की; भाजपाकडून मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही, जी जबाबदारी देण्यात येईल, त्यावर मी काम करेन. असं म्हणत त्यांनी विरोधकांना उत्तर दिलं.
🕐 1.15pm | 13-2-2024 📍 Nariman Point, Mumbai | दु. १.१५ वा. | १३-२-२०२४ 📍 नरिमन पॉईंट, मुंबई.
Live from BJP Maharashtra HQ @BJP4Maharashtra #Maharashtra #Mumbai #BJP #BJPMaharashtra https://t.co/jKpTym7qWk
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 13, 2024
आदर्शचा निकाल आमच्या बाजुने – अशोक चव्हाण
अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आपल्या आदर्श घोटाळ्यामुळे भाजपात प्रवेश केला असं म्हणत विरोधकांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. त्यांच्या टीकेला उत्तर देतांना ते म्हणाले की; “आदर्शचा निकाल आमच्या बाजुने लागला आहे, त्यामुळे मी कुठल्याही दबावामुळे मी हा पक्षप्रवेश करत नाही आहे.”
(हेही वाचा – Ashok Chavan यांनी कोणाच्या सल्ल्यावरून ‘परिवर्तन’ केले? ‘ते’ महंत कोण?)
आजपासून राजकीय प्रवासाची नवीन सुरुवात
आजपासून मी (Ashok Chavan) माझ्या राजकीय आयुष्याची नव्याने सुरुवात करत आहे. आज मी रितसर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत मी (Ashok Chavan) आज भाजपमध्ये प्रवेश केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community