राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी शिवाजी पार्कवर नाव न घेता केलेल्या टीकेला आता भाजपवासी असलेले अशोक चव्हाण यांनी उत्तर दिले आहे. याला उत्तर देतांना अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले की, राहुल गांधी यांचे वक्तव्य हास्यास्पद आहे. मी काँग्रेस सोडण्यापूर्वी सोनिया गांधींना (Sonia Gandhi) भेटलो नाही. मी काँग्रेस सोडणार आहे, हे कुणालाही माहीत नव्हत. शेवटपर्यंत काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात काम करत होतो.
(हेही वाचा – Arvind Kejriwal : ईडीच्या चौकशीकडे केजरीवालांनी पुन्हा फिरवली पाठ)
काय म्हणाले राहुल गांधी ?
१७ मार्च रोजी मुंबई येथील शिवाजी पार्क येथे झालेल्या इंडि आघाडीच्या (India Alliance) सभेत राहुल गांधी यांनी अशोक चव्हाणांचे नाव न घेता टीका केली आहे. राहुल गांधी म्हणाले होते की, महाराष्ट्रातल्या एका नेत्याने नुकतीच काँग्रेस सोडली. तो वरिष्ठ नेता काँग्रेस सोडण्यापूर्वी सोनिया गांधी यांना भेटला. मी या शक्तीसमोर लढू शकत नाही. जेलमध्ये जाणार नसल्याचे सांगत तो रडला, असे नाव न घेता राहुल गांधींनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली होती.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात झाला. शिवतीर्थावरील भाषणात राहुल गांधी यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली होती. ते सोनिया गांधींसमोर अक्षरशः रडले. मला तुरुंगात जायचं नाही, असे ते म्हणाले. दबावामुळे भाजपमध्ये (BJP) गेलेले ते एकटेच नेते नाहीत. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील नेते असेच भाजपमध्ये गेले नाहीत. मी ज्या शक्तीचा उल्लेख करत आहे त्या शक्तीने या लोकांचा गळा पकडून त्यांना सोबत घेतलं आहे. त्यामुळे हे लोक घाबरून भाजपसोबत गेले आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. (Ashok Chavan)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community