Ashok Chavan : चव्हाणांच्या सोडचिठ्ठीनंतर काँग्रेसने बोलावली आमदारांची बैठक

288
Ashok Chavan : चव्हाणांच्या सोडचिठ्ठीनंतर काँग्रेसने बोलावली आमदारांची बैठक
Ashok Chavan : चव्हाणांच्या सोडचिठ्ठीनंतर काँग्रेसने बोलावली आमदारांची बैठक

काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये (Congress) खळबळ माजली आहे. १४ फेब्रुवारी रोजी काँग्रेसने दिल्लीत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ही बैठक मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी देखील उपस्थित आहेत.

(हेही वाचा – Sai Resort Dapoli : अनिल परबांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना दिलासा; 11 महिन्यानंतर होणार सुटका)

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची 14 तारखेलाच मोठी बैठक होणार आहे. या बैठकीला काँग्रेसच्या सर्व आमदारांना उपस्थित रहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशोक चव्हाण यांच्यासोबत किती आमदार गेले, हे या माध्यमातून काँग्रेसला जाणून घ्यायचे आहे. त्यामुळे काँग्रेसकडून प्रत्येक आमदारांना संपर्क साधला जात आहे.

सर्व आमदारांची 14 फेब्रुवारीला बैठक

काँग्रेसचे नेमके किती आमदार अशोक चव्हाण यांच्यासोबत जाणार आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या यादीत अनेक आमदारांची नावे चर्चेत असली, तरी अद्याप कोणताच पत्ता उघड झालेला नाही. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर आपल्याच आमदारांची चाचपणी करण्यासाठी काँग्रेसने सर्व आमदारांची 14 फेब्रुवारीला बैठक बोलावली आहे. 15 फेब्रुवारीला अशोक चव्हाण हे अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये (BJP) प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काँग्रेस नेत्यांचे नियोजित कार्यक्रम रद्द

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) आणि राज्यातील काँग्रेस नेत्यांनी आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यालयात चव्हाण, बाळासाहेब थोरात व नसीम खान यांच्यात चर्चा सुरू आहे. अनेक आमदारांशी संपर्क साधला जात आहे. आमदारांनी ते काँग्रेससोबत कायम असल्याचे स्पष्ट केले आहे. (Ashok Chavan)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.