केंद्राने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा- अशोक चव्हाण

केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा असे आवाहन अशोक चव्हाण यांनी केले.

विधानसभेत मराठा आरक्षणावर चर्चा झाली. यावेळी राज्य सरकारने मराठा अरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट केली, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा असे आवाहन अशोक चव्हाण यांनी केले. यावेळी त्यांनी ५ न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. ९ ते ११ न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर हा प्रश्न जावा, असे तज्ञांचे मत असल्याचे सांगितले.

केंद्राने पुढाकर घ्यावा

आज सभागृहात विधानपरिषदमध्ये मराठा आरक्षणावर विस्तृत चर्चा झाली. सरकारने सांगतले आहे की ८ मार्चच्या अगोदर केंद्राने पुढाकार घेतला पाहिजे. देशात इडब्ल्यूएसच्या आरक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. १६ राज्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिकचं आरक्षण देण्यात आलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारने पुढाकार घेऊन आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, असं आवाहन अशोक चव्हाण यांनी केलं. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाची फिजिकल सुनावणी घ्यावी. ९ ते ११ न्याधीशांच्या खंडपीठासमोर मराठा आरक्षणाचा प्रश्न जावा. ५ न्यायाधीशांच्या बेंच पुढे हा विषय सुटणार नसल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे, असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं.

(हेही वाचाः सुधीर भाऊंचे भाषण ऐकून मुख्यमंत्र्यांना झाला नटसम्राटचा भास!)

चव्हाणांचे उत्तर दिशाभूल करणारे – विनायक मेटे

आज सभागृहात मराठा आरक्षणाबाबत प्रश्न उपस्थित झाला असता, सदर प्रश्नास मुख्यमंत्र्यांऐवजी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी उत्तर दिलं. वास्तविक या गंभीर महत्वाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री यांनी उत्तर दिले पाहिजे होते. अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षण विषयावर दिलेलं उत्तर गिळमिळीत व दिशाभूल करणारे होते, असं शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here