पवार-ममतांच्या भेटीवर अशोक चव्हाणांचे ट्विट आले चर्चेत

74

ममता बॅनर्जी सध्या महाराष्ट्राच्या दौ-यावर आहेत. त्यांनी या दौ-यादरम्यान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. काॅंग्रेस वगळून बाकीच्या पार्टी भाजपा विरोधात एकत्र आणण्यासाठी ममता बॅनर्जी दौरा करत आहेत, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. त्यावर काॅंग्रेसच्या अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. आता याच मुद्द्यावर काॅंग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे.

असे आहे ट्विट? 

या  ट्विटसोबत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचाही व्हिडिओ अशोक चव्हाण यांनी अपलोड केला आहे. त्यात विलासराव काँग्रेसचे वर्णन करताना दिसत आहेत. काँग्रेसची चाल बुद्धिबळातील हत्तीसारखी सरळ आणि थेट धडक देणारी आहे. काँग्रेस उंटासारखी तिरकी चालत नाही अन् घोड्यासारखी अडीच घरेही जात नाही, असा टोला अशोक चव्हाण यांनी लगावला आहे. अलिकडे काँग्रेसबाबत काही मंडळींना झालेल्या गैरसमजाच्या पार्श्वभूमीवर स्व. विलासराव देशमुख यांच्या या विधानाची सहज आठवण झाली, असेही चव्हाण यांनी नमूद केले आहे.

2024 चा प्रमुख चेहरा असणार ममता

सध्या ममता बॅनर्जींचे मिशन महाराष्ट्र सुरु आहे. विधानसभा निवडणुकीत बंगालमध्ये भाजपाला धूळ चारल्यानंतर आता ममता भाजपाविरोधात विरोधी पक्षांना एकजूट करण्याचे काम करत आहे. सध्याच्या हालचालीनुसार त्या आगामी 2024 च्या निवडणुकीच्या विरोधी पक्षांचा चेहरा असतील, अशा चर्चा रंगल्या आहेत.

 ( हेही वाचा: मुख्यमंत्र्यांना पुन्हा ‘वर्क फ्रॉम होम’! )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.