-
वंदना बर्वे
सध्या देशाच्या राजकारणाचा पारा चांगलाच चढला आहे. कारण ५ राज्यातील निवडणूकीची चर्चा सर्वत्र सुरु आहे. हा पक्ष जिंकणार की तो असे अंदाज व्यक्त केले जात आहे. मात्र याच पाच राज्यातील निवडणूकीवर अनेक दिग्गज नेत्यांचे राजकीय भविष्य देखील अवलंबून आहे. जर हे नेते या निवडणूकीत जिंकले तरच त्यांचा राजकीय भविष्य काळ उज्ज्वल असणार आहे. (Assembly Elections)
खरं तर राजकारण करताना कोणीही निवृत्ती घेत नाही. मात्र सक्रिय राजकारण करण्यासाठी सत्ता असणे आवश्यक असते. तीच सत्ता मिळविण्यासाठी पाचही राज्यातील नेते प्रचंड प्रमाणात प्रचार करण्यात व्यस्त आहेत. यापैकी काही नेत्यांनी विजय मिळवण्यासाठी सर्वच पातळीवर जोरदार प्रयत्नांची पराकष्टा केली आहे. या नेत्यांमध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वसुंधरा राजे, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या सह अनेक ज्येष्ठ नेत्यांना या निवडणुकीत जिंकणे आवश्यक आहे. अन्यथा यांना सक्रिय राजकारणातून बाहेरचा रस्ता दाखवायला पक्ष श्रेष्ठी मागे पुढे बघणार नाही, एवढे निश्चित. (Assembly Elections)
येत्या काळात केंद्र सरकारला मजबूत करण्यासाठी राजस्थान या राज्यांवरही मजबूत पकड असणे भाजपसाठी आवश्यक मानले जाते. त्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याशिवाय काँग्रेसच्यादृष्टीने ही निवडणूक सोपी वाटत असली तरी राजस्थानात त्यांना सत्ता टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. त्याचमुळे पाच राज्यांतील निवडणुका लोकसभेच्यादृष्टीने लिटमस टेस्ट ठरणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (Assembly Elections)
(हेही वाचा – World Cup 2023 : बांगलादेशने प्रदूषणामुळे रद्द केला नवी दिल्लीतील सराव)
आगामी काळात होत असलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका सर्वच राजकीय पक्षासाठी सत्त्वपरीक्षा पाहणाऱ्या ठरत आहेत. या निवडणुकांकडे मिनी लोकसभेच्या निवडणुका म्हणून पहिले जात असल्याने सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. या विधानसभा निवडणुका राजकीय पक्षांशिवाय अनेक दिग्गजांचे भवितव्य ठरणार आहेत. मध्य प्रदेशात भाजपने सामूहिक नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे भाजप पुन्हा सत्तेत आला तरी नेतृत्व सोपवले जाण्याची शक्यता कमी आहे. तर राजस्थानात काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता कमी असून, आले तरी त्यांना संधी मिळेल का? याबाबत साशंकता आहे. (Assembly Elections)
तेलंगणातील वातावरण सत्ताधारी विरोधी असल्याने मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यापुढील अडचणीत वाढ झाली आहे. छत्तीसगडमध्येही काँग्रेस पुन्हा सत्तेत आली, तर भूपेश बघेल यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. प्रत्येकांना राजकीय भवितव्य ठरविण्यासाठी ही निवडणूक जिंकणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे या मिळालेल्या संधीचे सोने त्यांना करावे लागणार आहे. नोव्हेंबर महिन्यात पाच राज्यांत होणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजप, काँग्रेस सह सर्वच पक्षांचा कस लागणार आहे. (Assembly Elections)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community