अबकी बार अस्लम शेख सलाखों के पार?

151

काही दिवसांपूर्वी मालाडचे आमदार अस्लम शेख देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते, या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. २०१९ च्या निवडणूकीपूर्वी अस्लम शेख भाजपामध्ये येण्याच्या विचारात होते. पण भाजपाच्या स्थानिक समर्थकांनी प्रचंड विरोध केला आणि ही बोलणी रखडली. आता फडणवीसांच्या भेटीमुळे शेख भाजपात प्रवेश करणार का? अशी चर्चा रंगत असतानाच अस्लम शेख यांना किरीट सोमैया यांनी जोरदार झटका दिलेला आहे. सोमैया यांनी आपली मोहिम आता अस्लम शेख यांच्याकडे वळवली आहे. नवाब मलिक आणि संजय राऊत यांच्या विरोधात किरीट सोमैया यांनी किल्ला लढवला आणि शेवटी त्यांना जेलमध्ये जावं लागलं.

शेख – मढ मार्वेत १००० कोटींचा स्टुडिओ घोटाळा

किरीट सोमैया हे भाजपामधील भ्रष्टाचारविरोधी चळवळीचा चेहरा मानले जातात. त्यांनी अनेकांचा भ्रष्टाचार पुराव्यांसह उघड केला आहे. आता मढ येथील स्टुडिओ घोटाळ्याप्रकरणी अस्लम शेख यांना पर्यावरण खात्याने नोटीस बजावली आहे. तसेच मुंबई जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेला कठोर कारवाई करण्याचे आदेश पर्यावरण विभागाने दिले आहेत. किरीट सोमैया यांनी या विषयावर एक ट्विट केलं आहे, “असलम शेख – मढ मार्वे रु. १००० कोटींचा स्टुडिओ घोटाळा. महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्रालयाने नोटीस जारी केली आहे. मला स्टुडिओ तोडण्याच्या कारवाईची अपेक्षा आहे.”

(हेही वाचा आमिर खानच्या Lal Singh Chaddha चित्रपटावर बंदीची मागणी! का सुरु आहे #BoycottLaalSinghCaddha ट्विटर ट्रेंड?)

कोणत्या कारणांमुळे शेख अडचणीत?

या ट्विटमुळे आता किरीट सोमैयांनी आपली मोहिम शेख यांच्याकडे वळवळी असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपाला मालाडमध्ये अस्लम शेख यांना पराभूत करता आलेलं नाही. याचं कारण तिथे वाढलेल्या अनधिकृत झोपडपट्ट्या, चालणारा वेश्या व्यवसाय आणि हिंदू विरोधी लॉबी असं सांगितलं जातं. हिंदूंना मालवणीतून पलायन करावे लागले अशा बातम्या आपण याआधी वाचल्या आहेत. शेख यांनी मालवणीत स्वतःचं वेगळं साम्राज्य निर्माण केलं असल्याचं म्हटलं जातं. महाविकासआघाडीत ते मंत्री असताना ग्राऊंडला टिपू सुल्तानचं नाव देण्यात आलं होतं. मालवणीतील गलिच्छ वस्ती आणि वाढत असलेली गुन्हेगारी अनेकांच्या डोक्याला ताप झालेली आहे.

मविआ सरकारने दिलेले संरक्षण

त्यात ठाकरे सरकारने त्यांना मंत्री करुन अस्लम शेख यांना अभय दिला होता. मात्र आता सरकार बदलल्याने अस्लम शेख यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. सध्या हा एक घोटाळा बाहेर आलेला आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीआधी अस्लम शेख व त्यांच्या मालवणीतील आणखी काही गोष्टी बाहेर येऊन शकतात. संजय राऊत यांचा फुगलेला फुगा फुटला. आता पाहायचे आहे की अस्लम शेख यांच्या साम्राज्याच्या विरोधात भाजपा कशाप्रकारे आव्हान उभं करु शकेल. किरीट सोमैया मनावर घेतात, तेव्हा ते प्रकरणाच्या मूळापर्यंत जातात असा अनुभव आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.