स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या अवमानकारक वक्तव्याचे पडसाद शुक्रवारीही विधानसभेत उमटले. वीर सावरकर आणि पंतप्रधान मोदींच्या अवमानप्रकरणी सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाल्याने विधानसभेचे कामकाज २० मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले.
( हेही वाचा : पालकांनो लक्ष द्या! स्कूल बसच्या शुल्कात १५ ते २० टक्क्यांनी वाढ, १ एप्रिलपासून होणार लागू)
वीर सावरकरांविषयी राहुल गांधी यांनी अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे गुरुवारी भाजपा-शिवसेनेच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोडेमारो आंदोलन केले होते. मात्र, त्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीने आक्षेप घेत सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला. सत्ताधारी आमदारांकडूनही त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. त्यामुळे गोंधळ निर्माण झाल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाचे कामकाज २० मिनिटांसाठी तहकूब केले.
गुजरातचा निरमा, क्लीनचीट मिळवा…
- गुजरातचा निरमा, क्लीनचीट मिळवा… पन्नास खोके, एकदम ओके…गुजरात निरमा… ईडी, सीबीआय, आयटी मागे नाही लागणार… वॉशिंग मशीन खोके, आणि गुजरातचा निरमा, महाशक्तीला पाठिंबा द्या आणि क्लीनचीट मिळवा… गुजरात निरमा अभियान, चला पवित्र होऊन येऊ… अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर निदर्शने केली.
- अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा शुक्रवारी सतरावा दिवस असून विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्यांवर उतरत महाविकास आघाडीच्या आमदारांनी गुजरातची निरमा आणि वॉशिंग मशीनचे बॅनर घेऊन जोरदार घोषणाबाजी केली.