Assembly Budget Session : प्रश्नोत्तर तासाला आमदारांची गैरहजेरी; विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्र्यांची नाराजी

57
Assembly Budget Session : प्रश्नोत्तर तासाला आमदारांची गैरहजेरी; विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्र्यांची नाराजी
  • प्रतिनिधी

विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा त्यात प्रश्नोत्तर तासाला आमदारांची अनुपस्थिती पाहायला मिळाली. यावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रश्न विचारणारे आमदारच सभागृहात हजर नसल्याने जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होऊ शकली नाही, याची खंत दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली. (Assembly Budget Session)

गुरुवारी सकाळी प्रश्नोत्तर तासाला सुरुवात होताच अध्यक्ष नार्वेकर यांनी पहिल्या तीन प्रश्नांची नावे पुकारली, परंतु संबंधित आमदार उपस्थित नव्हते. चौथ्या प्रश्नापूर्वीच मुख्यमंत्री फडणवीस यांनी हस्तक्षेप करत आपली नाराजी बोलून दाखवली. “गेल्या २५ वर्षांपासून मी सभागृहात आहे, पण पहिल्यांदाच असं पाहतोय की, प्रश्न विचारणारे आमदारच गैरहजर आहेत. ही अत्यंत गंभीर बाब आहे,” असे फडणवीस म्हणाले. त्यांनी यामुळे सभागृहाच्या कामकाजावर परिणाम होत असल्याचेही नमूद केले. (Assembly Budget Session)

(हेही वाचा – Chhattisgarh मध्ये चकमकीत ३ नक्षलवादी ठार; पोलिसांना मोठे यश)

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही या परिस्थितीवर नाराजी व्यक्त केली. “सोमवारीही असाच प्रकार घडला होता. तेव्हाही मी याची नोंद घेतली होती आणि असा निर्णय दिला होता की, आपला प्रश्न असताना सदस्य उपस्थित नसतील तर ते प्रश्न पुन्हा घेतले जाणार नाहीत. तरीही आज पुन्हा तीच परिस्थिती दिसली,” असे ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, “सदस्यांची अनुपस्थितीमुळे चुकीचा संदेश बाहेर जाऊ नये, याची काळजी घ्यायला हवी. प्रश्नोत्तर हे लोकप्रतिनिधींसाठी महत्त्वाचे आयुध आहे, त्याचा योग्य वापर व्हायला हवा.” (Assembly Budget Session)

नार्वेकर यांनी यावेळी आपली जबाबदारी अधोरेखित केली. “सभागृहातील सदस्यांचे संरक्षण करणे ही माझी जबाबदारी आहे, पण त्याचबरोबर चुकीचा संदेश बाहेर जाणार नाही, हे पाहणेही माझे कर्तव्य आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. विधानसभेच्या प्रत्येक बैठकीत पहिला तास प्रश्नोत्तरांसाठी राखीव असतो. संसदीय लोकशाहीत हे आयुध अत्यंत प्रभावी मानले जाते. यामार्फत लोकप्रतिनिधी जनतेच्या तक्रारी, अडचणी आणि प्रश्न सभागृहात मांडतात. राज्य सरकारच्या योजना, कार्यपद्धती आणि जनतेच्या गाऱ्हाण्यांवर शासनाची भूमिका जाणून घेण्यासाठी प्रश्नोत्तर तास महत्त्वाचा ठरतो. मात्र, आजच्या गैरहजेरीमुळे हे प्रश्न अनुत्तरीत राहिले. यामुळे जनतेच्या अपेक्षा पूर्ण होण्यात अडथळा निर्माण झाला आहे. सभागृहातील या प्रकाराने लोकप्रतिनिधींच्या जबाबदारीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (Assembly Budget Session)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.