Assembly Election 2023 : तीन राज्यांमध्ये भाजप आघाडीवर

262
Assembly Election 2023 : तीन राज्यांमध्ये भाजप आघाडीवर

लोकसभेची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या चार राज्य असलेल्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणामध्ये मतमोजणी सुरु आहे. सकाळी साडे दहा वाजेपर्यंत भाजपने मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान मोठी आघाडी घेतली आहे.

मध्यप्रदेश मध्ये काँग्रेसचे किंगमेकर होण्याचं स्वप्न भंगलं

मध्यप्रदेशात (MP Election 2023) विधानसभेच्या 230 जागांसाठीची मतमोजणी सुरू झाली आहे. पहिल्या कलामध्ये भाजपला बहुमत मिळाले आहे. भाजपने पहिल्या कलात 155 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसने अवघ्या 74 जागांवर आघाडी घेतली आहे. तर इतरांनी एका जागेवर आघाडी घेतली आहे. पहिल्या कलांमध्ये भाजपने बहुमतासाठीचा आकडा पार केल्याने मध्यप्रदेशाच किंगमेकर होण्याचं काँग्रेसचे स्वप्न भंगलं आहे.राज्यात बहुमतासाठी 116 जागा आवश्यक आहे. पहिल्या कलात भाजपने 155 जागांवर आघाडी घेऊन बहुमताचा आकडा पार केला आहे. अर्थातच दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल. राजस्थानमध्ये भाजप आघाडीवर आहे.

(हेही वाचा –  Rajasthan Assembly Election 2023 : राजस्थान मध्ये भाजप वरचढ ,काँग्रेसचीही घौडदौड सुरु)

  राजस्थान मध्यप्रदेश छत्तीसगढ तेलंगणा
भाजप ११३ १३९ ४९ १०
कॉँग्रेस ७० ९० ३९ ६५
बीआरएस       ४०
इतर १६ ०१ ०२ ०४
राजस्थानमध्ये भाजप आघाडीवर

राजस्थानमध्ये (Rajasthan Election 2023) भाजपचा करिश्मा पाहायला मिळत आहे. राजस्थानात भाजप 130 जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राजस्थानमध्ये विधानसभेच्या 200 जागांपैकी 199 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. 25 नोव्हेंबर रोजी राजस्थानमध्ये मतदान करण्यात आले. त्यामुळे आता संपूर्ण जनेतसह राजकारणी देखील अंतिम निक्लाची वाट पाहत आहे. दरम्यान राजस्थानमध्ये काँग्रेस आपली सत्ता टिकवण्यात यशस्वी होणार की भाजप बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, सध्या राजस्थानमध्ये भाजप 130 जागांवर तर काँग्रेस 61 जागांवर आघाडीवर आहे.

छत्तीसगडला भाजपचा सरकार स्थापनेचा दावा

सुरूवातीच्या फेऱ्यांमधील मतमोजणीचा कल पाहता भाजपने छत्तीसगडमध्ये विजय मिळवून सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. भाजपने आपल्या एक्स हँडलवरून पोस्ट केले आणि लिहिले, “भाजपने छत्तीसगडला नवसंजीवनी दिली आहे, देशात पुन्हा एकदा भाजपचे मोदी सरकार स्थापन होईल.

छत्तीसगडमध्ये मतमोजणी सुरू आहे. भाजपने बहुमताचा आकडा पार केला आहे. सध्या भाजप 49, काँग्रेस 39 आणि इतर दोन जागांवर आघाडीवर आहे.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.