देशातील मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा, मिझोरम या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. यापैकी राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशची (Assembly Election 2023) मतमोजणी आज म्हजेच रविवारी ३ डिसेंबर रोजी होणार आहे. तर मिझोरामची मतमोजणी उद्या सोमवारी ४ डिसेंबर रोजी होणार आहे.
उत्सुकता शिगेला
सकाळी ८ वाजल्यापासून मतदानाला (Assembly Election 2023) सुरुवात होणार असून सकाळी ११ वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. एक्झिट पोल नंतर सगळ्यांनाच या निकालाची उत्सुकता लागली आहे. त्यामुळे आज राजस्थानचा गड कोण राखणार ? किंवा मध्यप्रदेशमध्ये कमल फुलणार की कमलनाथ सत्तेत येणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
#WATCH | Strong police presence at a counting centre in Jodhpur as counting of votes in Rajasthan Assembly elections is set to begin shortly pic.twitter.com/J9Xuq0rc3X
— ANI (@ANI) December 3, 2023
(हेही वाचा – भारत-बांगलादेश सीमेवर रोहिंग्यांची घुसखोरी सुरूच; BSF ने ११२ जणांना केली अटक)
केंद्रीय निवडणूक आयोगाने ऑक्टोबरमध्ये जाहीर केलेल्या निवडणूक (Assembly Election 2023) कार्यक्रमानुसार छत्तीसगड विधानसभेच्या ९० जागांसाठी ७ आणि १७ नोव्हेंबर असे दोन टप्प्यात मतदान झाले होते. तर मध्यप्रदेश विधानसभेच्या २३० जागांवर १७ तारखेला मतदान झाले. राजस्थानच्या २०० जागांपैकी १९९ जागांवर २५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. तर तेलंगणाच्या ११९ जागांवर ३० नोव्हेंबरला मतदान पार पडले होते. तर मिझोराम विधानसभेच्या ४० जागांसाठी ७ नोव्हेंबरला मतदान झाले होते. (Assembly Election 2023)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community