Assembly Election 2023 : ‘एक अकेला सब पर भारी !’ स्मृती इराणींचं ट्विट चर्चेत

262
Assembly Election 2023 : 'एक अकेला सब पर भारी !' स्मृती इराणींचं ट्विट चर्चेत

लोकसभेची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या चार राज्य असलेल्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणामध्ये मतमोजणी (Assembly Election 2023) सुरु आहे. सकाळी साडे दहा वाजेपर्यंत भाजपने मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीन राज्यांमध्ये मोठी आघाडी घेतली.

त्यानंतर भाजप समर्थक आणि भाजपच्या (Assembly Election 2023) जेष्ठ नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी (Smriti Irani) यांनी एक ट्विट करत या विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले आहे. ‘एक अकेला सब पर भारी’ म्हणत हे मोदी मॅजिक असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी नरेंद्र मी मोदींचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नरेंद्र मोदी म्हणत आहे की, “देश बघत आहे एक अकेला अनेकांना भारी पडत आहे.” नरेंद्र मोदी यांचे हे भाषण लोकसभेतील आहे.

(हेही वाचा – Assembly Election 2023 : तीन राज्यांमध्ये भाजप आघाडीवर)

राजस्थानमध्ये भाजप आघाडीवर

राजस्थानमध्ये भाजपचा (Assembly Election 2023) करिश्मा पाहायला मिळत आहे. राजस्थानात भाजप १३० जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राजस्थानमध्ये विधानसभेच्या २०० जागांपैकी १९९ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. २५ नोव्हेंबर रोजी राजस्थानमध्ये मतदान करण्यात आले. त्यामुळे आता संपूर्ण जनेतसह राजकारणी देखील अंतिम निक्लाची वाट पाहत आहे. दरम्यान राजस्थानमध्ये काँग्रेस आपली सत्ता टिकवण्यात यशस्वी होणार की भाजप बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, सध्या राजस्थानमध्ये भाजप १३० जागांवर तर काँग्रेस ६१ जागांवर आघाडीवर आहे.

छत्तीसगडला भाजपचा सरकार स्थापनेचा दावा

सुरूवातीच्या फेऱ्यांमधील मतमोजणीचा कल पाहता (Assembly Election 2023) भाजपने छत्तीसगडमध्ये विजय मिळवून सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. भाजपने आपल्या एक्स हँडलवरून पोस्ट केले आणि लिहिले, “भाजपने छत्तीसगडला नवसंजीवनी दिली आहे, देशात पुन्हा एकदा भाजपचे मोदी सरकार स्थापन होईल.

(हेही वाचा – Assembly Election 2023 : भाजपच्या दिल्ली मुख्यालयात उत्साहाचे वातावरण)

मध्यप्रदेशमध्ये भाजपची बहुमताच्या आकड्यासह मोठी मुसंडी

मध्यप्रदेशमध्ये भाजपनं (Assembly Election 2023) बहुमताच्या आकड्यासह मोठी मुसंडी मारली आहे. कलांनुसार भाजपने १५८ जागांवर मुसंडी मारलीय. शिवराजसिंह चौहान सरकारवर मतदारांनी पुन्हा विश्वास टाकल्याचं दिसत आहे. तर कलांनुसार काँग्रेसला केवळ ७० जागांपर्यंत मजल मारता आली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.