Assembly Election 2023 Result : चार राज्यांच्या निकालांमुळे लोकसभेच्या ८२ जागांवर भाजपाची मोहर

394

देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका २०२४च्या लोकसभा निवडणुकीसाठी लिटमस टेस्ट होती. त्यामुळे या निवडणुकांचा निकाल (Assembly Election 2023 Result) काय लागतो, याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले होते. ५ राज्यांपैकी मिझोराम राज्य वगळता राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये भाजपने मध्य प्रदेशची सत्ता राखली, तर छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यांमधून काँग्रेसच्या हातून सत्ता खेचून घेतली. त्यामुळे भाजपचा २०२४च्या लोकसभा निवडणुकीसाठी आत्मविश्वास वाढला आहे. या चार राज्यांमध्ये भाजपने जेवढ्या विधानसभा निवडणुका जिंकल्या आहेत. त्यातून २०२४च्या लोकसभा निवडणुकीत ८२ लोकसभा जागा भाजप सहज जिंकू शकणार आहे.

काँग्रेस उत्तर भारत मुक्त होणार

केंद्रातील सत्ताधारी भाजपने राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत (Assembly Election 2023 Result) स्पष्ट बहुमत मिळवले आहे. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप या राज्यांतील ८२ पैकी बहुतांश जागा आपल्या खिशात सहजपणे टाकणार, असा दावा केला जात आहे. भाजपच्या या कामगिरीमुळे आता उत्तरप्रदेश, बिहार, दिल्ली, झारखंड, हिमाचल ही राज्ये पाहिल्यास २०२४मध्ये उत्तर भारत काँग्रेसमुक्त होईल का? अशीही चर्चा आता सुरू झाली आहे. कारण या भागात काँग्रेसकडे केवळ हिमाचल प्रदेश हे एकमेव राज्य उरले आहे.

(हेही वाचा Assembly Election 2023 Result : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडच्या ‘विजया’ने ‘ब्रँड मोदी’ मजबूत; 2018 मधून धडा घेतला आणि सत्ता आली)

मिनी लोकसभा 

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड व तेलंगणा या ४ राज्यांतील निवडणुकीकडे मिनी लोकसभा निवडणूक म्हणून पाहिले जात होते. या ४ पैकी ३ राज्यांत भाजपची एकहाती सत्ता आली. तर तेलंगणा या एकमेव राज्यांत काँग्रेसचा विजय झाला. या ४ राज्यांत लोकसभेच्या ८२ जागा आहेत. यात राजस्थानात २५, मध्य प्रदेशात २९, तेलंगणात १७ व छत्तीसगडमध्ये ११ जागा आहेत. त्यामुळे या सर्वच जागांवर भाजपचा विजय होईल असा दावा आता केला जात आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उपरोक्त ४ राज्यांतील ८२ पैकी ६६ जागा भाजपने जिंकल्या होत्या. त्यात राजस्थानातील सर्वच २५ भाजपने आपल्या खिशात घातल्या होत्या. तर मध्य प्रदेशातील २८, तेलंगणातील ४ व छत्तीसगडमधील ९ जागा भाजपने जिंकल्या होत्या. यामुळे भाजपची केंद्रातील सत्ता अधिक मजबूत झाली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.