छत्तीसगड (Chhattisgarh), मध्यप्रदेश (Madhya Pradesh) आणि राजस्थान (Rajasthan) या सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला. काँग्रेस केवळ तेलंगणामध्ये पुढे आहे. हा विजय पाहून भाजप नेते काँग्रेसवर निशाणा साधत आहेत. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी राहुल गांधींचे (Rahul Gandhi) एक जुने विधान शेअर केले. या व्हिडिओमध्ये त्यांनी चुकून त्यांचा पक्ष सत्तेतून बाहेर जात असल्याचे म्हटले होते.
(हेही वाचा – Assembly Election 2023 Result : पाकिस्तानी क्रिकेटपटूनेही उडवली काॅंग्रेसची खिल्ली)
सच हुई राहुल जी की भविष्यवाणी pic.twitter.com/lXQJCmdHG4
— Piyush Goyal (@PiyushGoyal) December 3, 2023
सत्ता जात आहे !
महिनाभरापूर्वी काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) पत्रकार परिषद घेत होते. त्या वेळी राहुल गांधींनी राजस्थान आणि छत्तीसगडमध्येही सत्ता जात असल्याचे चुकून म्हटले होते. काही काळानंतर या दोन राज्यांत आपले सरकार अजूनही सत्तेवर असल्याचे राहुल यांच्या लक्षात आले आणि त्यांनी ‘राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सरकार येत असून मध्य प्रदेशात आपले सत्ता जात आहे’, असे सांगून आपली चूक सुधारली. पण राहुल गांधींच्या वक्तव्याची छोटी क्लिप व्हायरल झाली आहे.
निकाल जवळपास स्पष्ट दिसत असताना भाजप नेते पियुष गोयल यांनी राहुल यांच्या जुन्या विधानाची अर्धी क्लिप पोस्ट करून त्यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यावर मंत्री गोयल यांनी म्हटले आहे, ”राहुलजींचे भाकीत खरे ठरले !”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community