‘पनौती’ हा शब्द वापरून राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींचा अपमान केला होता; पण खरी पनौती (Panauti) कोण आहे, हे जनतेने आज दाखवून दिले आहे. पंतप्रधान मोदींबद्दल अपशब्द बोलणे हे जनतेला मान्य नाही. या देशातील प्रत्येक मतदार नरेंद्र मोदी यांना मतदान करत आहे. आजच्या निवडणुकीमध्ये महिला मतदाराचे मी अभिनंदन करतो, मोठ्या प्रमाणात मतदार हा पंतप्रधान नरेंद्र यांच्या पाठीशी उभे आहे. आज या निकालामध्ये दिसत आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले. ३ राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर बोलतांना त्यांनी राहुल गांधींना टोला लगावला.
वर्ल्ड कप फायनल (World Cup Final) मॅच भारतीय क्रिकेट संघ हारल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी एक विधान केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे मॅच बघण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होते. त्यामुळे ही मॅच भारत हारला. ते पनौती आहेत, असे विधान राहुल गांधी यांनी केले आहे.
महाराष्ट्रात 45 हून अधिक जागांवर विजय होणार
या विधानाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. बावनकुळे पुढे बोलतांना म्हणाले की, ”महाराष्ट्रात 45 हून अधिक जागांवर विजय होईल. तीन राज्यांत भाजपला घवघवीत यश मिळाले. महाराष्ट्रात सुद्धा अशाच पद्धतीचे वातावरण आहे. महायुतीचे उमेदवार 45 पेक्षावर जागा निवडून येतील. त्यामुळे मोठा विजय आहे. नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास आहे.”
हेही वाचा –
Join Our WhatsApp Community