Assembly Election 2024 : ५५२ उमेदवारांचे अर्ज दाखल

35
Assembly Election 2024 : ५५२ उमेदवारांचे अर्ज दाखल
  • प्रतिनिधी

महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ मतदारसंघात निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्र भरण्याचा गुरुवार तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी म्हणजे २४ ऑक्टोबर २०२४ रोजी राज्यातून आतापर्यंत ५५२ उमेदवारांचे ७२० नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत, अशी माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – Congress ला वाटाघाटीत अडकवून पवार-ठाकरे प्रचारात!)

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता १५ ऑक्टोबर २०२४ पासून लागू झाली असून २२ ऑक्टोबर २०२४ रोजी निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. नामनिर्देशन पत्र भरणे सुरु असून २९ ऑक्टबरला नामनिर्देशन पत्र भरण्याची शेवटची तारीख आहे. या अर्जाची ३० ऑक्टोबरला छाननी करण्यात येऊन ४ नोव्हेंबर २०२४ रोजी अर्ज मागे घेता येईल. मतदान २० नोव्हेंबरला होत असून २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे. (Assembly Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.