Assembly Election 2024 : ‘मुंब्रा ड्रग्स मुक्त करणार’ अजित पवारांचा दावा

43
Assembly Election 2024 : ‘मुंब्रा ड्रग्स मुक्त करणार’ अजित पवारांचा दावा
Assembly Election 2024 : ‘मुंब्रा ड्रग्स मुक्त करणार’ अजित पवारांचा दावा

विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) प्रचाराचा अंतिम टप्पा सुरु झाला आहे. सर्वत्र प्रचार सभा, रोड शो सुरु आहेत. येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, प्रचारसंभाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार नजीब मुल्ला (Najeeb Mulla) यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुंब्रयात जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी पवारांनी हे विधान केले. (Assembly Election 2024)

प्रचारार्थ सभेत जनतेला संबोधित करताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, मुंब्रा ड्रग्जमुक्त (Mumbra is drug free) करायचे आहे, हा माझा वादा आहे. या मतदारसंघात पाच वर्षांच्या कामांसाठी तीन हजार कोटी देणार आहे. त्यासाठी मुंब्रा-कळवामधील राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे हात मजबूत करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

(हेही वाचा – Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सूचक ट्विट; नव्या राजकीय वादळाचे संकेत?)

या वेळी अजितदादांनी अल्पसंख्याक मुलांनी जास्त शिकले पाहिजे, त्या प्रत्येक मुलांसाठी तसेच परदेशी शिक्षणासाठी ४० लाखांची शिष्यवृत्ती (Scholarships for Study Abroad) दिली आहे. राज्यामधील अल्पसंख्याक वंचित राहू नये, म्हणून मार्टीची स्थापना केली. संभाजीनगर येथे अल्पसंख्याक आयुक्तालय बनवल्याचे सांगितले.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.