Assembly Election 2024 : अर्ज दाखल करण्यासाठी गुरुपुष्यामृतचा मुहूर्त

एकनाथ शिंदे, छगन भुजबळ अर्ज दाखल करणार

64
Assembly Election 2024 : अर्ज दाखल करण्यासाठी गुरुपुष्यामृतचा मुहूर्त
  • प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीसाठी येत्या गुरुवारचा गुरुपुष्यामृतचा मुहूर्त साधत बहुतांश उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना संबंधित उमेदवाराकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. गुरुवार (२४ ऑक्टोबर) दिग्गज उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक प्रचाराला सुरुवात करतील. (Assembly Election 2024)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे २४ ऑक्टोबरला कोपरी-पाचपाखाडी विधानसभा अर्ज दाखल करणार आहेत. शिंदे यांचा अर्ज दाखल करण्यापूर्वी शिवसेनेकडून लाडक्या भावाचा अर्ज भरू या, असे आवाहन महिला वर्गाला करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे हे आयआयटी वागळे इस्टेट येथे अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी शिवसेना खासदार नरेश म्हस्के, डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह पक्षाचे नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – वक्फ विधेयकावरील JPC बैठकीमध्ये खासदारांमध्ये हाणामारी)

राष्टवादी काँग्रेस अजित पवार गटाचे येवला विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार छगन भुजबळ हे सुद्धा गुरुवारी अर्ज भरणार आहेत. यानिमित्ताने भुजबळ समर्थकांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असून भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयातून रॅली काढण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील अजित पवार गटाचे उमेदवार दिलीप वळसे पाटील हे सुद्धा २४ ऑक्टोबरला अर्ज भरणार आहेत. तसेच शिवसेना उबाठाचे नेते आदित्य ठाकरे हे गुरुवारी वरळीमधून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. (Assembly Election 2024)

दरम्यान, गुरुवार २४ ऑक्टोबरला बहुतांश उमेदवार अर्ज भरणार आहेत. त्यामुळे तत्पूर्वी महाविकास आघाडीतील जागावाटप अंतिम करून उमेदवार जाहीर केले जातील, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली. (Assembly Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.