Assembly Election 2024: निवडणूक भरारी पथकाची मोठी कारवाई; दुचाकीवरुन नेत होता दीड कोटी रुपये

113
Assembly Election : मुंबईत निवडणूक प्रचार काळात पकडली ४४ कोटींची रोख रक्कम; २२५ किलोचे ड्रग्ज केले जप्त
राज्यात विधानसभा (Assembly Election 2024) निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम टप्पा सुरु झाला आहे. सर्वत्र प्रचार सभा, रोड शो सुरु आहे. उमेदवार रात्रंदिवस एक करत आहेत. त्याचवेळी पोलीस आणि निवडणूक आयोगाचे भरारी पथकही डोळ्यात तेल घालून सक्रीय आहे. दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर आदर्श आचारसंहिता (code of conduct) लागू आहे. पैसे, मद्य यावर लक्ष ठेऊन आहे. या पार्श्वभूमी नागपुरात (Nagpur Nakabandi) मोठी रक्कम जप्त झाली आहे. रोकड एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारावर तहसील पोलिसांनी सापळा लावून कारवाई केली असून, यात कॅश स्वरूपात रक्कम जप्त करण्यात आली आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी २८८ मतदारसंघासाठी मतदान होणार असून, २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. (Assembly Election 2024)

असा रचला सापळा

नागपूरमधील सेंट्रल अव्हेन्यू रोडवर (Central Avenue Road) दुचाकीवरून जात असताना पोलिसांनी संशयित्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्यामुळे विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्याच्या बॅगेमध्ये एक कोटी ३५ लाख ५९ हजार रुपये मिळून आले. या पैशांचा कोणताही खुलासा करु शकले नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या पैशांचा गैरवापर होण्याचा संशय पोलिसांना आला. त्यामुळे ही रोकड जप्त करुन आचारसंहिता (code of conduct) सुरू असल्याने निवडणूक विभागाकडे स्वाधीन करण्यात आली आहे.

(हेही वाचा – Assembly Elections 2024 : नातूंवर टीका रामदास कदमांच्या मुलाला गुहागरमध्ये भोवणार?)

११ नोव्हेंबरपर्यंत ४९३कोटी जप्त

राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे राज्यभरात करवाईचे सत्र सुरु आहे. १५ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर २०२४ पर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ व मौल्यवान धातू जप्त करण्यात आले आहे. एकूण ४९३ कोटी ४६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

हेही वाचा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.