Assembly Election 2024 : मुलुंड मतदारसंघ जिंकणे भाजपासमोर आव्हान

79
Assembly Election 2024 : मुलुंड मतदारसंघ जिंकणे भाजपासमोर आव्हान
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

उत्तर पूर्व अर्थात ईशान्य मुंबईतील मुलुंड विधानसभेत भाजपाला मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळाले असले तरी प्रत्यक्षात या मतदार संघात पुन्हा कोटेचा यांना उमेदवारी दिल्यास मुलुंडमधील मतदारांची नाराजी भाजपासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. मुलुंडमधील मराठी आणि गुजराती वादामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष असून जर काँग्रेस किंवा उबाठा शिवसेनेने मराठी उमेदवार दिल्यास कोटेचा यांना घाम फुटला जाणार आहे. परंतु मराठी चेहरा दिल्यास भाजपाला याचा अधिक फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबईतून भाजपाने मुलुंडचे आमदार मिहिर कोटेचा यांना उमेदवारी दिली. परंतु शिवाजी नगर मानुखर्द विधानसभा मतदार संघात कोटेचा हे पिछाडीवर असल्याने तसेच इतर मतदार संघात कमी मताधिक्य मिळाल्याने त्यांचा पराभव झाल्याचे बोलले जात असले तरी कोटेचा याचा पराभव हा भाजपाच्या पदाधिकारी व नेते यांना विश्वासात न घेता त्यांना बाजूला ठेवत घेतलेला निर्णय कारणीभूत असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – BJP च्या उमेदवार निवड प्रक्रियेबाबत पक्षातच नाराजीचा सूर!)

लोकसभा निवडणुकीत मुलुंड विधानसभा मतदार संघात भाजपाचे कोटेचा यांना १ लाख १६ हजार मते तर उबाठा शिवसेनेचे संजय पाटील यांना ५५ हजा ९७९ मते मिळाली होती. त्यामुळे कोटेचा यांना स्वत:च्या विधानसभा मतदार संघात निम्म्यापेक्षा अधिक मताधिक्य घेतले असले तरी प्रत्यक्षात काही मराठी मतदारांनी भाजपाला मतदान न केल्याची माहिती समोर येत आहे. मुलुंड मतदार संघात निवडणुकीपूर्वीच मराठी व अमराठी मुद्दयाची चर्चा होती आणि त्यातच अमराठी उमेदवार दिल्याने मराठी उमेदवारांनी भाजपाच्या उमेदवाराकडे पाठ फिरवल्याची माहिती समोर येत आहे. लोकसभेला मोठ्याप्रमाणात मतदारांनी भाजपाला मतदान केले असले तरी विधानसभेला गुजराती समाज मोठ्याप्रमाणात मतदानासाठी बाहेर पडत नाही. याचा प्रत्यय मागील विधानसभा निवडणुकीत आला होता. मागील विधानसभेत १ लाख ५४ हजार ६१५ मतदारांनी मतदान केले होते आणि त्यात कोटेचा यांना ८७ हजार २५३ मते मिळाली होती. त्यामुळे मनसेचे अस्तित्व कमी असूनही या मतदार संघात तेव्हा हर्षला चव्हाण यांना सुमारे ३० हजार मते मिळाली होती, तर काँगेसचे गोविंद सिंह यांना २३ हजार ८५४ मते मिळाली होती तर पाच हजार मते नोटाला गेली होती. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – Hit And Run प्रकरणात खासदार चंद्रकांत हांडोरेंच्या मुलाला अटक)

मुलुंड विधानसभा मतदार संघात सन १९९९ पासून २०१४ पर्यंत सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून येणाऱ्या भाजपाचे सरदार तारासिंग यांना वयोमानानुसार उमेदवारी न देता त्यांच्याऐवजी सन २०१९ मध्ये मिहिर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामध्ये मिहिर कोटेचा या ८७, २५७ मते मिळवून विजयी झाले होते. परंतु यंदाची स्थिती वेगळी असून या मतदार संघात महाविकास आघाडीकडून या जागेवर काँग्रेसकडून दावा केला जात आहे. त्यामुळे काँग्रेसकडून चरणजित सिंग सप्रा आणि राकेश शेट्टी यांची नावे चर्चेत असून मराठी चेहरा म्हणून उत्तम गिते यांचेही नाव चर्चेत आहे. तर उबाठा शिवसेनेकडून मुलुंडमध्ये चेहरा असून नसून बाहेरुन उमेदवार आयात करावा लागेल असे बोलले जात आहे. तर मनसेकडून सत्यवान दळवी यांचे नाव प्रथेप्रमाणे चर्चेत असले तरी प्रत्यक्षात मनसेकडून ही लढवली जावी की नाही याबाबत कोणत्याही हालचाली दिसून येत नाही. तर भाजपाकडून पुन्हा कोटेचा यांची उमेदवारी निश्चित मानली जात असली तरी मराठी वादा फटका त्यंना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उबाठा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट आणि काँग्रेसची ताकद असल्याने कोटेचा यांना घाम आणला जाण्याची शक्यता आहे. परंतु कोटेचा यांना उमेदवारी न दिल्यास माजी खासदार मनोज कोटक, आणि मराठी चेहऱ्यांमध्ये प्रभाकर शिंदे आणि प्रकाश गंगाधरे यांच्या नावाचा विचार केला जावू शकतो, असे बोलले जात आहे. (Assembly Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.