- सचिन धानजी, मुंबई
छत्रपती शिवाजी महाराज मैदान या ऐतिहासिक मैदानावर अर्थात शिवाजी पार्क या मैदानावर आपल्या पक्षाची निवडणूक प्रचारसभा व्हावी असे वाटत असले तरी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election 2024) हे मैदान काही महाविकास आघाडीतील घटक पक्षांना मिळवता येणार नाही, असे स्पष्ट दिसून येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर प्रचारसभांसाठी जे तीन दिवस शिल्लक होते, ते तिन्ही दिवस महायुतीतील शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या प्रचारसभांसाठी मंजूर झालेले आहे. त्यामुळे दिवसच शिल्लक नसल्याने या मैदानावर दोन्ही ठाकरेंना सभा घेण्याची इच्छा जरी असली तरी या सभांसाठी असणारे दिवसच शिल्लक नसल्याने या मैदानावरील सभा घेण्याचे मनसुबे दोन्ही ठाकरेंचे उधळले जाण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू असून या निवडणुकीत प्रचाराच्या समारोपाची किंवा प्रचाराची एक सभा दादर शिवाजी पार्क मैदानावर व्हावी अशी प्रत्येक पक्षाची इच्छा असते. यासाठी प्रत्येक पक्षांकडून बांधणी केली जाते. हे मैदान प्रचारासाठी उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून परवानगीसाठीचा अर्ज महापालिकेच्या स्थानिक जी-उत्तर विभागात केला जातो. हे अर्ज पुढील मंजुरीसाठी विभाग कार्यालयाच्या माध्यमातून अभिप्राय नोंदवून निवडणूक विभागाकडे मंजुरीसाठी पाठवले जातात. त्यानुसार प्राधान्य क्रमानुसार आलेले अर्ज हे पालिका विभाग कार्यालयाकडून अतिरिक्त आयुक्त व आयुक्त यांच्या माध्यमातून पुढील परवानगीसाठी आपल्या अभिप्राय सह निवडणूक आयोगाला सादर करण्यात येतात. यंदाच्या निवडणुकीत शिवाजी पार्कचे मैदान प्रचारसभेसाठी प्राप्त व्हावे याकरता अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यात शिवसेनेकडून दिनांक १० नोव्हेंबर आणि भारतीय जनता पार्टी पक्षाकडून १२ नोव्हेंबर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्याकडून १४ नोव्हेंबर या दिवशी मैदान उपलब्ध करून देण्यास परवानगी मिळावी या आशियाची पत्र महापालिकेला प्राप्त झाली आहेत. त्यानुसार शिल्लक दिवसाच्या विचार करता महापालिकेने हे पहिले तीन अर्ज मंजुरीसाठी पुढे पाठवले आणि या तिन्ही पक्षांचे अर्ज मंजूर करून त्यांना परवानगी मिळाली आहे, अशी माहिती मिळत आहे. दरम्यान, १४ नोव्हेंबरच्या दिवशी महायुतीची सभा होईल असे बोलले जात आहे.
(हेही वाचा – Amazon Clinic : ॲमेझॉन क्लिनिकवर २९९ रुपयांपासून वैद्यकीय सेवा उपलब्ध, भारतीय ऑनलाईन औषध सेवा चालवणाऱ्या कंपन्यांचं काय होणार?)
शिवाजी पार्क मैदानात ३९ दिवस हे विविध सभा आणि कार्यक्रमांसाठी दिले जाऊ शकतात. आणि राज्य शासन तथा सरकारच्या अधिकारात सहा दिवसांची परवानगी दिली जाते. त्यातील राज्य शासन तथा राज्य सरकारच्या अखात्यात येणारे सहा दिवसांची परवानगी घेऊन त्यांचा वापर झालेला आहे. त्यामुळे सहा दिवसांचा कोटा संपलेला आहे. तर त्याव्यतिरिक्त जो ३९ दिवसांची परवानगी देण्याची तरतूद आहे, त्यातील ३ दिवसच शिल्लक आहेत. त्यामुळे या शिल्लक दिवसाचा विचार करुन महापालिकेने पहिल्या तीन अर्जांचा विचार केला आहे. त्यानुसार शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सभांना परवानगी मिळाली आहे. (Assembly Election 2024)
मात्र दहा नोव्हेंबर रोजी शिवसेनेने मैदान जाहीर सभेसाठी परवानगी घेतली असली तरी प्रत्यक्षात प्रचारसभेचे कोणतीही तयारी अद्याप या मैदानावर दिसून येत नाही. त्यामुळे ही सभा जरी झाली नाही तरी राजकीय पक्षाकडून या दिवसाची परवानगी दिली गेल्यामुळे हा दिवस दिवस ग्राह्य धरला जाऊ शकतो. मात्र, या मैदानासाठी या तिन्ही पक्षाच्या अर्जानंतर मनसे आणि त्यानंतर उबाठा शिवसेना यांचे अर्ज असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाने आज जर ही तारीख रद्द केली तर हा दिवस बाद होईल आणि मनसेला १४ तारखेचा पुढील दिवस मिळेल. पण त्यासाठी शिवसेना पक्षाला अर्ज मागे घ्यावा लागणार आहे, आणि त्यांनी अर्ज मागे किंवा रद्द न केल्यास मनसेला सभेसाठी हे मैदान मिळवता येणार नाही, असे बोलले जात आहे. दरम्यान, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा १७ नोव्हेंबर रोजी स्मृतिदिन असून या दिवशी शिवसैनिक स्मृतीस्थळी वंदन करण्यासाठी येत असल्याने छत्रपती शिवाजी महाराज मैदानात मोठी गर्दी होते. त्यामुळे या दिवशी कुणालाही परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे बोलले जात आहे. त्यामुळे उबाठा शिवसेनेचे आणि शिवसेनेची शिवसैनिक हे या दिवशी मोठ्या संख्येने गर्दी करून त्याचे रुपांतर सभेत केले जाऊ शकते, असाही अंदाज वर्तवला जात आहे. माहीम विधानसभा मतदारसंघात मनसेचे अमित ठाकरे, शिवसेनेचे सदा सरवणकर आणि उबाठा शिवसेनेचे महेश सावंत हे निवडणूक रिंगणात आहेत. (Assembly Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community