Assembly Election 2024 : कोल्हापुरात काँग्रेसचा प्लॅन ‘बी’; या उमेदवाराला देणार साथ

124
Assembly Election 2024 : कोल्हापुरात काँग्रेसचा प्लॅन ‘बी’; या उमेदवाराला देणार साथ
Assembly Election 2024 : कोल्हापुरात काँग्रेसचा प्लॅन ‘बी’; या उमेदवाराला देणार साथ

कोल्हापूर (Kolhapur Assembly) उत्तरमध्ये कॉंग्रेस उमेदवार मधुरीमाराजे यांनी विधानसभा निवडणुकीचा अर्ज मागे घेतल्यानंतर माजी मंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांच्यावर नामुष्की ओढवली आहे. दरम्यान, मधुरिमाराजे यांचा अचानकपने माघार घेतल्यामुळे महाविकास आघाडीकडे उमेदवारच नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कॉंग्रेसने एक नवा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.  (Assembly Election 2024)

राजेश लाटकर यांना पाठिंबा

काँग्रेसने राजेश लाटकर (Congress Rajesh Latkar) यांना पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे. लाटकर हे काँग्रेसचेच नेते आहेत. पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर लाटकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. याच लाटकर यांच्यामागे आता काँग्रेस आपली ताकद उभी करणार आहे. 

(हेही वाचा – Rooting For Pujara & Rahane ? अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा पुन्हा भारतीय संघात येऊ शकतील का?)

सतेज पाटील यांची तीव्र नाराजी

मधुरिमाराजे (Madhurimaraje) यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर कोल्हापूरचे काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. माघार घ्यायची होती तर उभे राहायचेच नव्हते. उभे राहणार नाही, हे अगोदरच सांगायला हवे होते, असे म्हणत सतेज पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, आता कोल्हापुरात येथे उमेदवारच नसल्यामुळे काँग्रेसची मोठी अडचण झाली आहे. काँग्रेसचे हात हे निवडणूक चिन्हच यावेळी कोल्हापूर उत्तर या मतदारसंघात नसेल. त्यामुळे येथे काँग्रेसवर (Congress) एका अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याची वेळ आली आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.