Assembly Election 2024 : दहिसरमध्ये महाविकास आघाडीचे ठरले, पण भाजपा चौधरींना कायम ठेवते की बदलते?

57
Assembly Election 2024 : दहिसरमध्ये महाविकास आघाडीचे ठरले, पण भाजपा चौधरींना कायम ठेवते की बदलते?
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातील दहिसर विधानसभा क्षेत्रात भाजपाकडून खांदेपालट होण्याची शक्यता असून या मतदार संघात विद्यमान आमदार मनिषा चौधरी यांना कायम ठेवतात की विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना उमेदवारी देण्याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहे. मात्र, हा मतदार संघ महाविकास आघाडीकडून उबाठा शिवसेनेकडून आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे दहिसरमधून माजी आमदार, उपनेते विनोद घोसाळकर यांचे नाव चर्चेत असल्याने यंदा भाजपाला ही निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे. घोसाळकर हे निवडणूक लढवण्यावर ठाम असले तरी मातोश्रीची इच्छा मात्र अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याची आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा घोसाळकर यांची ताकद आणि सोबतीला सहानभूती असल्याने काहीशी ताकद वाढलेली आहे, त्यामुळे ते महायुतीच्या उमेदवारासमोर कडवे आव्हान उभे करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. (Assembly Election 2024)

दहिसर विधानसभेत सन २००९ मध्ये शिवसेनेचे विनोद घोसाळकर हे आमदार म्हणून निवडून आले होते आणि सन २०१४ मध्ये युती तुटल्यामुळे भाजपाने मनिषा चौधरी आणि शिवसेनेने विनोद घोसाळकर तर काँग्रेसने शितल म्हात्रे यांना उमेदवारी दिली. पण या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या डॉ. शुभा राऊळ यांनी बंडखोरी करत मनसेकडून उमेदवारी मिळवत निवडणूक लढवली होती. घोसाळकर याच्या विरोधात तीन महिलांनी आव्हान निर्माण केल्याने त्यांचा ३८ हजारांनी पराभव झाल. त्यात भाजपाच्या चौधरी यांना ८७ हजार मते मिळाली होती, तर घोसाळकर यांना ३८ हजार ६६० मते मिळाली होती, तर काँग्रेसच्या शितल म्हात्रे यांना २१ हजार आणि मनसेच्या शुभा राऊळ यांना १७ हजार मते मिळाली होती. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – सुदृढ आणि स्वच्छ समाज घडवण्यासाठी आध्यात्म आवश्यक – President Draupadi Murmu)

परंतु सन २०१९ मध्ये युती झाल्याने विद्यमान आमदार असल्याने मनिषा चौधरी यांना उमेदवारी मिळाली आणि त्या ६३ हजार मताधिक्यांनी विजयी झाल्या. यात चौधरी यांना ८७ हजार मते तर काँग्रेसचे अरुण सावंत यांना २३ हजार ६९० मते पडली होती. भाजपा स्वतंत्र लढत असताना ७७ हजार मते मिळाली पण युतीत असताना ८७ हजार मते मिळाल्याने चौधरी यांच्या मतात सन २०१९ मध्ये फारशी वाढ दिसून आली नाही तसेच शिवसेनेचे मतदार मतदानासाठीच उतरले नव्हते असेही बोलले जात आहे. (Assembly Election 2024)

परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दहिसर विधानसभा मतदार संघातून युतीचे उमेदवार पीयूष गोयल यांना मताधिक्य मिळाले असले तरी प्रत्यक्षात विधनसभा निवडणुकीतील मतांमध्ये मोठा फरक होण्याची शक्यता आहे. दहिसरमधून प्रविण दरेकर हेही इच्छुक असल्याचे बोलले जात आहेत. त्यामुळे चौधरी आणि दरेकर यांच्यात याठिकाणी स्पर्धा असून महाविकास आघाडीकडून ही जागा उबाठा शिवसेनेला असल्याने घोसाळकर यांच्याशिवाय कुणाचेही नाव स्पर्धेत नाही. माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाल्याने याच्या सहानभूतीचा फायदा घेण्याचा प्रयत्न उबाठा शिवसेनकडून केला जाणार असून त्याचसाठी विनोद घोसाळकर आणि तेजस्वी घोसाळकर यांच्यापैंकी एक जण निवडणूक रिंगणात उभे राहिल असे बोलले जात आहे. मात्र, यात विनोद घोसाळकर हे निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे बोलले जात आहे. (Assembly Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.