Assembly Election 2024 : आचारसंहिता लागू होईपर्यंत चर्चेचे गुऱ्हाळ!

137
Assembly Election 2024 : आचारसंहिता लागू होईपर्यंत चर्चेचे गुऱ्हाळ!
Assembly Election 2024 : आचारसंहिता लागू होईपर्यंत चर्चेचे गुऱ्हाळ!
  • हिंदुस्थान पोस्ट ब्युरो

केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात राज्याला भेट देऊन निवडणुक यंत्रणांच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला. त्याचबरोबर महाविकास आघाडी आणि महायुतीतील प्रमुख सहा पक्षांसह जवळपास ११ विविध राजकीय पक्षांशी चर्चा केली.

चर्चेचे गुऱ्हाळ आचारसंहितेपर्यंत सुरूच

महायुतीमधील भाजपा-शिवसेना (शिंदे) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांची राष्ट्रवादी तसेच महाविकास आघाडीतील कॉंग्रेस-शिवसेना उबाठा आणि शरद पवार (Sharad Pawar) यांची राष्ट्रवादी यांच्यातील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही आणि अंतिम जागावाटप हे आदर्श आचारसंहिता लागू होईपर्यंत होणारही नाही, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – Urdu Teachers Association : उर्दू शाळेत नव्या गणवेशाला विरोध, उर्दू शिक्षक संघटनेचा मनमानी कारभार)

कॉंग्रेसचा मुख्यमंत्री पदावर डोळा

महाविकास आघाडीत शरद पवार (Sharad Pawar) यांनी ‘स्ट्राइक रेट’ने अन्य दोन्ही मित्रपक्षांवर मात करायचे ठरवले असल्याचे दिसते. त्यामुळे एकीकडे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना जागावाटपाची जबाबदारी देत थोडे नरमाईचे धोरण स्वीकारत स्वतः बारकाईने मतदारसंघ आणि उमेदवारांचा अभ्यास सुरू केला आहे. तर कॉंग्रेसला लोकसभा निवडणुकीत अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. यामुळे आघाडीत सर्वाधिक जागा लढवून सर्वाधिक जागा जिंकायच्या आणि मुख्यमंत्री पदावर दावा ठोकायचा, या अविर्भावात कॉंग्रेस नेते वावरताना दिसत आहेत. तर शिवसेना उबाठाने सर्व जबाबदारी प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर सोडून दिली असून ते पक्षाचे जे काही भवितव्य ठरवतील ते मान्य असेल, हे धोरण अवलंबले असल्याचे चित्र आहे. (Assembly Election 2024)

युतीमध्ये राष्ट्रवादी ‘नावडती’

महायुतीतही भाजपा १५०-१६० जागा लढवणार आणि उर्वरित जागा अन्य दोन पक्षांना विभागून देणार हे जवळपास निश्चित झाल्याचे दिसून येत आहे. ही निवडणूक शिवसेना (शिंदे) आणि अजित पवार यांचा पक्ष भाजपाच्या नेतृत्वात लढणार आहे, त्यामुळे भाजपाकडून जितक्या जास्त जागा पदरात पाडून घेता येतील त्यावर त्यांचे राजकीय भवितव्य ठरेल. शिंदे यांच्या शिवसेनेची ८०-९० जागांची मागणी असून अजित पवार (Ajit Pawar) यांना किमान ६०-६५ जागा मिळतील, अशी अपेक्षा केली जात आहे. मात्र, भाजपाने १५० जागा लढल्या तरी उर्वरित १३०-१३५ मध्ये शिवसेना-राष्ट्रवादीला समाधान मानावे लागेल. तर आल्यादिवसापासून महायुतीत अजित पावर (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीची प्रतिमा ‘नावडती’ अशी झाल्याने त्यांना ४० पेक्षा अधिक जागा मिळतील याची शक्यता कमीच दिसते. यावरून महायुतीत जोरदार खटके उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – Maha Kumbh : महाकुंभात स्नान करण्यासाठी येणाऱ्यांची आधारकार्ड तपासा, सुरक्षेसाठी आखाड्याची मागणी)

मनसेचे ‘एकला चलो रे’

एकूणच पुढील आठवडाभरात विधानसभा आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे. महायुती आणि महाविकास आघाडीप्रमाणे वंचित बहुजन आघाडी, राजू शेट्टी, बच्चू कडू, छत्रपती संभाजी राजे यांची तिसरी आघाडीही तयारीला लागली असून राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनादेखील ७०-८० जागा लढेल, या तयारीत असून सध्या तरी मनसेचे ‘एकला चलो रे’चे धोरण दिसते आहे. राज ठाकरे यांनी राज्यात काही भागात दौरेही सुरू केले असून कार्यकर्त्यांकडून आढावा घेणे आणि चाचपणी करणे सुरू आहे. तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील विरुद्ध ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा प्रभाव निवडणुकीत तुरळक प्रमाणात ग्रामीण भागात दिसला तर आश्चर्य वाटू नये. (Assembly Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.